कोरोनामुळे गेल्या वर्षभरात अनेकांनी आपले प्राण गमावले. अनेक कुटूंबे उद्ध्वस्त झाली. अशा परिस्थितीत आपल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांसाठी आशेचा किरण बनून पुढे आलय Reliance उद्योगसमूह... कोरोनामुळे जीव गमावलेल्या रिलायन्स कर्मचा-यांच्या कुटूंबियांसाठी कंपनीने पुढील पाच वर्षे पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नव्हे तर मृत कर्मचा-यांच्या मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च रिलायन्स उद्योग समूहाकडून (Reliance Company) केला जाणार आहे. हा एक चांगला उपक्रम रिलायन्सने आपल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांसाठी राबविला असल्याचे सांगितले जात आहे.
देशात कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोक-या गेल्या. यात रिलायन्सने आपल्या कर्मचा-यांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, रिलायन्स उद्योग समूहाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी रिलायन्स फॅमिली सपोर्ट अँड वेलफेअर स्कीम (Reliance Family Support and Welfare scheme) ची घोषणा केली आहे.हेदेखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी RIL Jamnagar, TheJSWGroup, Dolvi and Bellary सह अनेक स्टील प्लांट्स ने Liquid Medical Oxygen पुरवठा केल्याबद्दल मानले आभार
रिलायन्स फॅमिली सपोर्ट स्कीममधून कोणकोणत्या प्रकारची मदत मिळेल?
1. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पुढील पाच वर्षे कर्मचाऱ्याचा पगार मिळत राहील
2. पीडित परिवाराला एकरकमी रुपये 10 लाखांची आर्थिक मदत दिली जाईल
3. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च रिलायन्स इंडस्ट्रीजकडून केला जाईल
4. मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांना देशातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाल्यावर, त्या अभ्यासक्रमाचं शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क आणि पाठ्यपुस्तकाचा खर्च यासाठी येणारा पूर्ण खर्च रिलायन्सकडून पुरवला जाईल.
5. मुलाचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत, पती-पत्नी, आई-वडील मुलं यांचा सर्व प्रकारचा वैद्यकीय खर्च कंपनीकडून केला जाईल
6. सध्या जे कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी कोरोनाबाधित आहे, ते शारीरिक मानसिकदृष्ट्या ठीक होईपर्यंत कोविड 19 रजा घेऊ शकतात
7. जे कर्मचारी रिलायन्स उद्योग समूहासाठी काम करतात, मात्र कंपनीच्या पे रोलवर नाहीत, त्यांचं कोरोनामुळे निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना एकरकमी दहा लाख रुपयांची मदत मिळेल.