Teacher PC PIXABAY

Teacher Dress Code Rules: महाराष्ट्र राज्यात शिंदे सरकारने सर्व शाळेतील शिक्षकांसाठी नवीन निर्णय घेण्यात आला आहेत. जसा विद्यार्थांसाठी ड्रेस कोड असतो तसाच आता शिक्षकांसाठी देखील नवा ड्रेस कोड लागू होणार आहे. लोकसभा निवडणूकी पूर्वी राज्य सरकारने शिक्षकांसाठी नियम लागू केले आहेत. महिला शिक्षकांसाठी सलवार, चुडीदार आणि साडी असा ड्रेस कोड राहणार तर पुरुष शिक्षकासाठी शर्ट आणि ट्राऊझर पँट असा ड्रेस कोड राहणार आहे. (हेही वाचा- राज्यात शिक्षक पदभरती होणार, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांची मोठी घोषणा)

नवी नियमानुसार, जसं डॉक्टरांच्या नावामागे Dr. लावतात, वकिलांच्या नावामागे Ad लावतात त्याचप्रमाणे आता शिक्षकांच्या नावामागे Tr.  लावले जाणार आहे. ही घोषना महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आला आहे. मराठी मध्ये नावामागे टी. लिहावा. आता इतर प्रोफेशन प्रमाणे शिक्षक हे प्रोपफेशन दिसून येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरविण्यात यावा.

शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी मुंबईत एका भाषणात या नवी नियमासंदर्भात माहिती दिली. एवढेच नव्हे तर शिक्षकांनी कोणतेही विचित्र प्रकराचे कपडे आणि गडद रंगाचे कपडे परिधान करू नयेत असे ही सांगण्यात आले आहे. शिक्षकांनी परिधान केलेले कपडे हे स्वच्छ व नीटनेटके असावेत. पुरुष शिक्षकाने शर्टं इन करावी याची दक्षता घ्यावी. कोणत्याही नक्षीकाम नसलेले कपडे परिधान करू नयेत. त्याचप्रमाणे पोषाखाला शोभतील असे चप्पल आणि बुट घालावेत. जर वैद्यकिय कारण असेल तर सवलत दिली जाईल अशी माहिती सांगण्यात आली.