महाराष्ट्रातील डिएड-बीएडचं शिक्षण घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांना प्रतिक्षा होती ती शिक्षक पदभरतीची. पण आता या उमेदवारांची प्रतिक्षा संपली असुन शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकरांनी याबाबत एक मोठी घोषणा केली आहे. विविध शाळांमध्ये असणारी शिक्षकांच्या रिक्त पदांची समस्या सुटण्यार आहे कारण राज्यात आता लवकरचं शिक्षक भरती होणार असल्याची दिपक केसरकरांनी सांगितलं आहे. गेले काही दिवसांपूर्वीच राज्यात पोलिस भरतीची प्रक्रीया पार पडली तर आता शिक्षक भरती होणार असुन सुशिक्षिक बेरोजगारांसाठी ही सुवर्णसंधी आहे असं म्हणायला हरकत नाही.
राज्यात शिक्षक पदभरती प्रकिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध शाळांमध्ये असणारी शिक्षकांच्या रिक्त पदांची समस्या सुटण्यास मदत होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री @dvkesarkar यांनी दिली.
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) December 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)