केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्त (New Election Commissioners) पदाच्या दोन रिक्त जागांवर ज्ञानेश कुमार (Sukhbir Sandhu) आणि बलविंदर संधू (Gyanesh Kumar) यांची निवड झाल्याचा दावा काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आयुक्तपदाची एक जागा आगोदरच खाली होती. त्यातच केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी तडखाफडकी राजीनामा दिल्याने दुसरी जागाही रिक्त झाली होती. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. दरम्यान, दोन नव्या आयुक्तांच्या निवडीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडणार होती.
अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू यांची निवड निवडणूक आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी ही माहिती गुरुवारी (14 मार्च 2024) दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, दोन निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी ते निवडणूक प्रचार सोडून दिल्लीला दाखल झाले होते. ही निवड तत्काळ होणे गरजेचे होते कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी या जागा रिक्त ठेवायच्या नव्हत्या. खरे तर ही बैठक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन घेण्यात आली आहे. कारण, न्यायालयाच्या निर्णानुसार निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीमध्ये न्यायाधीशांचाही समावेश आहे. पण, सरकारने या प्रक्रियेतून न्यायाधीशांनाच वगळले आहे.
व्हिडिओ
#WATCH | After the meeting of selection committee to pick the Election Commissioner, the Leader of Congress in Lok Sabha, Adhir Ranjan Chowdhury says, "They (govt) have the majority (in the committee who appoints election commissioner). Earlier, they had given me 212 names, but… pic.twitter.com/90x3uLxGsx
— ANI (@ANI) March 14, 2024
अधीर रंजन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोद यांच्याव्यक्तीक्त केवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच होते. आयुक्तांच्या निवडीसाठी मी आगोदरच एक सूची मागितली होती. जेणेकरुन आम्ही त्यातून निवड करु शकत होतो. मात्र, ती संधीच आम्हाला मिळाली नाही. मला 212 नावांची यादी देण्यात आली होती. 212 लोकांची माहिती तातडीने घेणे शक्य नव्हते. त्यात समितीतील बहुमत सरकारकडे आहे. त्यामुळे आयुक्तांची निवड ही सरकारची पसंती असणाऱ्या व्यक्तीचीच होणार हे उघड आहे.
अरुण गोयल यांनी 8 मार्च रोजी राजीनामा दिल्याने आणि 14 फेब्रुवारी रोजी अनुप चंद्र पांडे यांच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेल्या रिक्त पदांमुळे या नियुक्त्या आवश्यक झाल्या होत्या. तीनपैकी दोन आयुक्तांची जागा खाली झाल्याने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे मतदान प्राधिकरणाचे एकमेव सदस्य राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील, निवड समितीमध्ये केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश आहे. नियुक्ती अधिकृतपणे अधिसूचित झाल्यानंतर, त्यांना नवीन कायद्यानुसार प्रथम चिन्हांकित केले जाईल. हा कायदा तीन सदस्यीय निवड समितीला शोध समितीने शॉर्ट-लिस्ट न केलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्याचा अधिकार देतो.