Gold, Silver Rate: शेेअर बाजार तेजीत, सोने-चांदी काळवंडले; पाहा कितीने घसरले दर
Gold Rate | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या काळात जागतिक पातळीवर शेअर बाजार (Stock Market) वधारला आहे. त्यामुळे सोने-चांदी (Gold, Silver) दरात घसरण पाहाला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीनुसार दिलेल्या वृत्तात आयएएनएस वृत्तस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, शुक्रवारी (17 एप्रिल 2020) सोने (Gold Rate), चांदी दरात कमालीची घसरण पाहायला मिळाली. जणू काही शेअर बाजारापुढे सोने-चांदी काळवंडल्याची स्थिती होती. स्थानिक वायदे बाजारात गेल्या सत्रात प्रति तोळा (10 ग्रॅम) 47000 रुपये विक्रमी स्थान सोने दराने मिळवले होते. मात्र, शुक्रवारी सोने दर प्रति तोळा (10 ग्रॅम) 46000 रुपये दराने खाली आले. एमसीएक्सवर सोने गुरुवारी 47327 रुपये प्रति तोळा (10 ग्रॅम) इतक्या स्थरावर राहिले.

देशातील सर्वात मोठी कमोडिटी वायदा बाजार मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्सवर दुपारी 12.38 वाजता सोने दर आगोदरच्या सत्राच्या तुलनेत 1278 रुपयांनी म्हणजेच 2.70 टक्क्यांनी कमजोर राहिला. या कमजोरीसोबत सोने दर प्रति तोळा (10 ग्रॅम) 45980 रुपये इतका राहिला. त्या आधी सोने दर प्रति तोळा (10 ग्रॅम) 45614 रुपयांनी घसरला. (हेही वाचा, RBI गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी वर्तविली जागतिक महामंदीची शक्यता तर G20 बाबतीत भारताची स्थिती अन्य देशांच्या तुलनेत उत्तम)

दरम्यान, सोन्याच्या दरात चांदीही गेल्या सत्रात 1280 रुपये म्हणजेच 2.89 टक्के कमजोर स्थितीत दिसली. या कमजोरीसोबत चांदी दर प्रति किलो 42975 रुपये प्रति किलो दराने राहिली. या आधी चांदी दर प्रति किलो 42752 रुपये इतका घसरला.