Shaktikant Das (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिदास दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेचा आढावा घेत समोर आलेल्या अथवा येणा-या परिस्थितीबाबत माहिती दिली. देशाची अर्थव्यवस्था ही पहिल्यापेक्षा थोडी कोलमडून गेली आहे. हे नुकसान कमी करण्याचे आम्ही पूर्ण प्रयत्न करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या स्थितीत भविष्यात जागतिक मंदी निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोना मुळे GDP चा वेग 1.9 इतका राहणार आहे. G20 देशांमध्ये भारताची स्थिती समाधानकारक आहे. जगभरात 9 ट्रिलियन डॉलर अतके नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शक्तिकांत दास यांनी रिजर्वह रेपो रेट मध्ये घट झाल्याची घोषणा केली आहे. रिजर्व्ह बँकेकडून रिव्हर्स रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची घट केली आहे. त्याचबरोबर आता ही 3.75 टक्के इतकी झाली आहे. त्याशिवाय 50 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त मदत देण्याची RBI ने घोषणा केली आहे.

हेदेखील वाचा- Coronavirus Outbreak in India: भारत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 13000 च्या पार; 437 Covid 19 रुग्णांचा मृत्यू

RBI गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी कोरोना मुळे GDP चा वेग मंदावेल मात्र काही कालावधीनंतर हा वेग जोर पकडेल. भारताची GDP 1.9 च्या वेगाने वाढेल. G20 देशांमध्ये ही स्थिती सर्वसाधारण बरी आहे.

त्याचबरोबर ATM पूर्ण क्षमतेसह 90% काम करत असल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली. नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यांची कामे सुरु आहेत. बँकांजवळ पैशाची कमतरता नाही असेही त्यांनी सांगितले.