COVID-19 (Photo Credits: IANS)

भारत देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसागणित वाढत आहेत. आज देखील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळत आहे. भारत देशात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 13,387 वर पोहचला आहे. त्यापैकी 1749 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 437 रुग्णांना कोरोना संसर्गामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्णांची संख्या अधिक आहे. तर त्यात सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोरोना बाधित असून राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 3000 च्या पार गेली आहे.

कोरोना विषाणूंचा फैलाव कमी करण्यासाठी सरकारचे विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणांसह, पोलिस, सरकारी अधिकारी कार्यरत आहेत. तर या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अनेक कर्मचारी काम करत आहेत. (भारतात लॉकडाऊन वाढविल्यामुळे भारतीय रेल्वे सेवा 3 मे रात्री 12 वाजेपर्यंत स्थगित)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसचा देशभरातील वाढता फैलाव पाहता लॉकडाऊनचा कालावधी 19 दिवसांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता देश 3 मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना आपण साथ देणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकार आणि आरोग्य यंत्रणेने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.