Election | (Representational Image)

State-Wise Lok Sabha Constituency Numbers: देशभरामध्ये सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगान जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार देशभरात लोकसभा निवणूक 2024 सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक आपले सरकार निवडण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांचा समावेश होतो. लोकशाही शासन व्यवस्थेतील हा एक मोठा व्यायाम आहे. मात्र इतकीच त्याची व्याप्ती नाही. लोकसभेतील सर्व जागा या मतदारांद्वारे मतदान केलेल्या प्रतिनिधींची निवड करुन भरल्या जातात. त्यासाठीच निवडणूक असते. भारतीय संसदेचे लोकसभा हे कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते. ज्याची विद्यमान सदस्यसंख्या आहे 545 इतकी. अर्थात देशभरात निवडणूक पार पडते ती केवळ 543 जागांसाठी. उर्वरीत दोन जागा या अँग्लोइंडियन सदस्यांसाठी राखीव असता. याशिवाय एकूण 543 जागांपैकी 79 SC आणि 41 ST साठी राखीव आहेत. इथे आपण देशातील विविध राज्यांमध्ये असलेल्या एकूण लोकसभा जागांची संख्या पाहू शकता.

देशातील राज्यनिहाय लोकसभा सदस्य संख्या

S.No.

State/Union Territory

General

SC

ST

Total

1 ANDAMAN AND NICOBAR ISLANDS

1

0

0

1

2 ANDHRA PRADESH

34

6

2

42

3 ARUNACHAL PRADESH

2

0

0

2

4 ASSAM

11

1

2

14

5 BIHAR

33

7

0

40

6 CHANDIGARH

1

0

0

1

7 CHHATTISGARH

5

2

4

11

8 DADRA AND NAGER HAVELI

0

0

1

1

9 DAMAN AND DIU

1

0

0

1

10 DELHI

6

1

0

7

11 GOA

2

0

0

2

12 GUJARAT

20

2

4

26

13 HARYANA

8

2

0

10

14 HIMACHAL PRADESH

3

1

0

4

15 JAMMU AND KASHMIR

6

0

0

6

16 JHARKHAND

8

1

5

14

17 KARNATAKA

24

4

0

28

18 KERALA

18

2

0

20

19 LAKSHADWEEP

0

0

1

1

20 MADHYA PRADESH

20

4

5

29

21 MAHARASHTRA

41

3

4

48

22 MANIPUR

1

0

1

2

23 MEGHALAYA

2

0

0

2

24 MIZORAM

0

0

1

1

25 NAGALAND

1

0

0

1

26 ORISSA

13

3

5

21

27 PONDICHERRY

1

0

0

1

28 PUNJAB

10

3

0

13

29 RAJASTHAN

18

4

3

25

30 SIKKIM

1

0

0

1

31 TAMIL NADU

32

7

0

39

32 TRIPURA

1

0

1

2

33 UTTAR PRADESH

63

17

0

80

34 UTTARANCHAL

4

1

0

5

35 WEST BENGAL

32

8

2

42

TOTAL

423

70

41

543

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रतिनिधित्व या तत्त्वांचे समर्थन करणाऱ्या मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका आयोजित करण्यात भारताला अभिमान वाटतो. सार्वत्रिक निवडणुका या देशाच्या लोकशाही आचारसंहिता आणि निवडणूक प्रक्रियेद्वारे नागरिकांना सक्षम बनविण्याच्या समर्पणाचा पुरावा म्हणून काम करतात.