SpiceJet Layoff: स्पाइसजेट टाळेबंदी, 15% कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा
SpiceJet | (twitter/ANI)

गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आणि खर्च (Budget Airline) कमी करण्याच्या उद्देशाने हवाई वाहतूक करणाऱ्या स्पाईसजेट कंपनीने टाळेबंदी (Spicejet Lay Off) करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. स्पाईसजेटने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, कंपनी एकूण कर्मचाऱ्यांपैकी 15% कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करणार आहे. ज्यामुळे 1,400 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. कंपनीच्या ताफ्यात एकेकाळी 118 विमाने होती. ज्यासाठी जवळपास 16,000 कर्मचाऱ्यांचा ताफा होता. मात्र, पुढे आर्थिक गर्तेत सापडल्याने स्पाईसजेट कंपनीने कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली. मीडिया रिपोर्टनुसार सध्या एअरलाइनमध्ये सध्या 9,000 कर्मचारी आहेत आणि सुमारे 30 विमाने चालवतात.

स्पाईसजेटकडून कर्मचारी कपातीची पुष्टी

स्पाईसजेट कंपनीने कर्मचारी कपात करत असल्याची पुष्टी केली आहे. भविष्यातील आव्हाने आणि दीर्घकालीन योजना डोळ्यासमोर ठेऊन कंपनीला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कर्मचारी कपात करण्याच्या निर्णयाच्या माध्यमातून कंपनी वाढीव खर्चावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, सध्या 9,000 लोकांना रोजगार देणारी आणि परदेशी वाहकांकडून भाडेतत्त्वावर आठ विमानांसह सुमारे 30 विमाने चालवणारी एअरलाइन, 60 कोटी रुपये इतक्या थकीत पगाराचा खर्च व्यवस्थापित करण्यासाठी संघर्ष करत आहे. (हेही वाचा, SpiceJet flight च्या मुंबई- बेंगलोर विमानप्रवासात टॉयलेट मध्ये अडकलेल्या प्रवाशाला मिळणार पूर्ण रिफंड)

कंपनीवर आर्थिक ताण पगारही थकले

स्पाईसजेट सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. ज्यामुळे कंपनीच्या उलाढालीवर प्रचंड परिणाम होऊ पाहतो आहे. त्यातच कर्मचाऱ्यांचे पगारही थकल्याने व्यवस्थापनापुढे आव्हान निर्माण झाले आहे. सांगितले जात आहे की, कंपनी आर्थिक संकटांचा सामना करत असल्याने कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर देऊ शकत नाही. परिणामी अनेक कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. परिणामी संभाव्य खर्चांवर मर्यादा घालण्यासाठी कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा, SpiceJet च्या विमानात को पायलट कडून मराठीत सूचना; सोशल मीडीयामध्ये व्हिडिओ वायरल (Watch Video))

एक्स पोस्ट

गुंतवणुकदारांचे हित आणि आर्थिक नियोजनासाठी निधी जमविण्याचे प्रयत्न

वाढता आर्थिक दबवा कमी करण्यासाठी स्पाईसजेट प्रचंड प्रयत्न करत आहे. त्यासाठी आवश्यक ₹2,200 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. दरम्यान, स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, कोणताही निधी विलंब झालेला नाही आणि आम्ही आमच्या निधीच्या वाढीत चांगली प्रगती करत आहोत. त्यानुसारच आम्ही आमच्या सार्वजनिक घोषणा आधीच केल्या आहेत. आम्ही आता एक पाऊल पुढे टाकत आहोत. त्यामुळे अशा निर्णायक टप्प्यावर आम्ही आवश्यक घोषणाही करु. आमच्या गुंतवणुकदारांमध्येही वाढ झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, स्पाईसजेटच्या हालचाली आणि घडामोडींवर गुंतवणुदार बारीक लक्ष ठेऊनआहेत.