Flight प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credit- X)

Operation Sindoor Travel Advisory India: भारतीय लष्करानं पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं पाकीस्तानला जशास तसं उत्तर दिलं आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर (Operation Sindoor) पाकिस्तान पुरता बिथरला. सीमाभागात पाकिस्तानकडून मंगळवारी रात्रीपासूनच कुरापती वाढल्या असून, शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यासोबतच पाककडून सातत्यानं भारतीय हवाई हद्दीत (Flights Cancelled) घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत आहे. भारतीय सैन्यानं हे प्रयत्न हाणून पाडले असले तरीही भारतात सतर्कतेचा इशारा म्हणून सर्व विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी काही महत्त्वाच्या आणि स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत. Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून भारताचं उत्तर; पाकव्याप्त कश्मीर, पाकिस्तान मध्ये 9 ठिकाणी हल्ला

बहावलपूर,मुरिदके,गुलपूर,भीमबर, चक अमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुजफ्फराबाद या 9 ठिकाणांवर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उदवस्त केले. रात्री 1 वाजून 44 मिनिटांनी हे हल्ले करण्यात आले आहेत. दरम्यान यामध्ये नागरिक किंवा पाकिस्तानी सैन्यदलावर कोणताही हल्ला झालेला नाही.

इंडिगो एअरलाईन्स फ्लाईट रद्द

'ऑपरेशन सिंदूर' नंतर इंडिगो एअरलाईन्सनं एक्सच्या माध्यमातून पोस्ट करत एअरस्पेसमध्ये होणाऱ्या बदलांच्या अनुषंगानं श्रीनगर, जम्मू, लेह, चंदीगढ आणि धरमशाला येथील ये-जा करणाऱ्या सर्व फ्लाईट अर्थात उड्डाणं प्रभावित होणार असल्याचं सांगितलं आहे. परिणामी विमानतळावर पोहोचण्याआधी प्रवाशांनी विमानाचं स्टेटस तपासून पाहावं आणि सर्व सूचनांनवर लक्ष ठेवावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

स्पाईसजेट एअरलाईन्स फ्लाईट रद्द

याच धर्तीवर स्पाईसजेटनं प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या असून, त्यांनीही उत्तर भारतातील धरमशाला, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसर विमानतळ पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याच सांगितल आहे. प्रवाशांना विमानाचं स्टेटट तपासूनच प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे.

एअर इंडियाच्या फ्लाईट रद्द

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलेला असतानाच एअर इंडियानं जम्‍मू, श्रीनगर, लेह, जोधपुर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगढ आणि राजकोट येथील सर्व फ्लाईट तूर्तास रद्द केल्या आहेत.

संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीमध्ये भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना आपलं लक्ष्य केले आहे.