OPERATION SINDOOR | Photo Credits: Piyush Goyel

22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) च्या माध्यमातून घेतला आहे. भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद मध्ये 9 ठिकाणांवर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उदवस्त केल्याची माहिती देण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीमध्ये भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना आपलं लक्ष्य केले आहे. रात्री 1 वाजून 44 मिनिटांनी हे हल्ले करण्यात आले आहेत. दरम्यान यामध्ये नागरिक किंवा पाकिस्तानी सैन्यदलावर कोणताही हल्ला झालेला नाही.

'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून बहावलपूर,मुरिदके,गुलपूर,भीमबर, चक अमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुजफ्फराबाद मध्ये हा हल्ला करण्यात आला आहे.

आज सकाळी 10 वाजता या 'ऑपरेशन सिंदूर' चं मीडीया ब्रिफिंग दिले जाणार आहे. पाकिस्तानचे लष्करी प्रवक्ते आणि आयएसपीआरचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्याची पुष्टी केली आहे आणि दावा केला आहे की 24 वेळा त्याचे परिणाम झाले आहेत. India Bans All Imports From Pakistan: भारताचा पाकिस्तानवर आर्थिक सर्जिकल स्ट्राईक! पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर तात्काळ बंदी.  

ऑपरेशन सिंदूर मधून दहशतवाद्यांवर हल्ला

भारतीय लष्कराने बदला घेतला

भारतीय सैन्याने सर्व नऊ ठिकाणांवर केलेला हल्ला यशस्वी झाला आहे, असे सूत्रांनी ANI ला सांगितल्याचे वृत्त आहे. भारतातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात भूमिका बजावणाऱ्या जैश ए मोहम्मद आणि लष्करच्या नेतृत्वाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने हल्ल्यांसाठी हे ठिकाण निवडले होते. भारतातील दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी जबाबदार असलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या प्रमुखांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने ही ठिकाणे निवडली, असे सूत्रांनी सांगितले.

भारताच्या संरक्षण मंत्रालयाने पुष्टी केली की हे हल्ले "ऑपरेशन सिंदूर" चा भाग होते, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते.

पहलगाम दहशतवादी हल्ला

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 25 भारतीय नागरिक आणि 1 नेपाळी नागरिकावर बैसरण व्हॅली मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यांना धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.