Maharashtra Politics: किरीट सोमय्या यांनी उद्धव यांच्यावर केलेल्या ट्विटवर शिंदे गटातील आमदार संतप्त, म्हणाले- आम्हाला सत्तेचा मोह नाही
Kirit Somaiya (Photo Credit: Twitter)

भाजप नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांनी उद्धव ठाकरेंबाबत (Uddhav Thackeray) केलेल्या ट्विटमुळे शिंदे गटातील आमदार संतप्त झाले आहेत. किरीट सोमय्या यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये (Tweet) उद्धव ठाकरेंसाठी माफिया हा शब्द वापरला होता, त्याला उत्तर देताना शिवसेनेच्या दोन आमदारांनी आक्षेप घेतला आहे. बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी या ट्विटवर नाराजी व्यक्त केली आहे. आपण उद्धव ठाकरेंसोबत नसलो तरी पक्ष मात्र सध्या आमचाच असल्याचंही संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

संजय गायकवाड म्हणाले की, किरीट सोमय्या यांना सांगायचे आहे की, आम्ही शिवसेनेपासून फारकत घेतली असली तरीही आम्ही शिवसेनेतच आहोत. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दलचा आपला आदर कमी झाला आहे, असे आत्ता समजू नका. आम्ही भाजपसोबत सरकार स्थापन केले असेल, पण ज्या पक्षातून आम्ही आलो आणि मोठे झालो, त्या पक्षाबद्दल आम्ही चुकीचे ऐकू शकत नाही. याबाबत त्यांना आमची नम्र विनंती आहे. आम्हाला सत्तेची ओढ नाही, आम्ही या सर्व गोष्टी सहन करू शकत नाही. (हे देखील वाचा: Eknath Shinde on Uddhav Thackeray : आमचा न्यायपालिकेवर पुर्ण विश्वास : एकनाथ शिंदे)

अब्दुल सत्तार म्हणाले की, किरीट सोमय्या साहेब जे बोलले ते चुकीचे आहे. जो कोणी येतो किंवा जातो त्याबद्दल कोणीही असा शब्द उच्चारू नये. महाराष्ट्रात प्रत्येकाला राहण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. किरीट सोमय्या जे बोलतात त्याबद्दल मी बोलणे योग्य नाही.