Coronavirus in India (Photo Credits: PTI)

देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) शिरकाव केल्यापासून केंद्र सरकार, राज्य सरकार याबाबत उपयोजना राबवत आहेत. यामध्ये टेस्टिंग ही फार महत्वाची गोष्ट होती. या चाचण्यांमधून जितके कोरोनाचे रुग्ण समोर आले त्याच्या कितीतरी पटीने अधिक लोकांना हा संसर्ग झाला असल्याची शक्यता आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या चतुर्थांश म्हणजेच 300 दशलक्ष लोकांमध्ये कोरोना अँटीबॉडीज सापडल्या आहेत. सीरोलॉजिकल सर्व्हेसंबंधित (Serological Survey) स्रोतांचा हवाला देऊन हा दावा केला गेला आहे. आतापर्यंत भारतातील 18 दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, जी अमेरिका वगळता जगातील कोणत्याही देशातील सर्वोच्च आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) हे सर्वेक्षण केले आहे. आयसीएमआरने या सर्वेक्षणाचे निकाल जाहीर केले आहेत मात्र सर्वेक्षणात किती लोकांचा समावेश होता, याची माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही सर्वेक्षण करण्यात आले. त्यात 29 हजार लोकांचा समावेश होता. ते सर्व 10 वर्षांवरील लोक होते. सर्वांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले असता, 15 लोकांपैकी एकामध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज आढळल्या. त्याचवेळी शहरातील झोपडपट्टी परिसरातील 6 पैकी 2 जणांमध्ये कोरोना अ‍ॅन्टीबॉडीज आढळल्या.

याशिवाय काही आठवड्यांपूर्वी दिल्ली सरकारने एक सर्वेक्षण अहवालही प्रसिद्ध केला आहे. यात दिल्लीमध्ये राहणाऱ्या 2 कोटींपैकी निम्म्याहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे म्हटले आहे. यामध्ये 7 लाखाहून अधिक लोकांच्या वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या. टेस्टिंग कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वृत्तसंस्थेच्या रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, दिल्लीतील 55% लोकांना आधीच कोरोनाची लागण झाली आहे. डब्ल्यूएचओने आधीच सांगितले आहे की कोरोना साखळी तोडण्यासाठी 60% ते 70% लोकसंख्येमध्ये रोग प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. (हेही वाचा: देशात कोरोना विषाणूमुळे 734 डॉक्टरांचा मृत्यू; केंद्र सरकारने सांगितलेला 162 आकडा चुकीचा- IMA)

दरम्यान, बुधवारी मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासांत  देशात 11,039 कोरोनाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत 1.54 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. या व्यतिरिक्त संक्रमित लोकांची संख्याही कमी झाली आहे. सप्टेंबरच्या मध्यभागी दररोज 1 लाख कोरोनाची प्रकरणे नोंदविली जात होती.