Schools Reopening Guidelines Across India: कोरोना व्हायरसचे महासंकट देशावर असले तरीही जनजीवन सामान्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने 15 ऑक्टोंबर पासून देशातील शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात आले. मात्र सध्या कंन्टेंटमेंट झोन वळून अन्य परिरासतील शाळा महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे शाळा कधी सुरु करायच्या याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागणार आहे. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सुचना (SOP) तयार करण्याचा आग्रह केला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्र डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, पालकांची संमती असेलच तर विद्यार्थ्यांना शाळेत जाता येणार आहे. DoSEL यांच्या नुसार ही मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत.(Coronavirus: नोटांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो का? आरबीआयने दिली 'अशी' माहिती)
शिक्षण मंत्र्यांनी असे म्हटले आहे की, विद्यार्थी शारिरिक रुपात उपस्थिती असण्याऐवजी ऑनलाईन वर्ग सुरु करण्याचा ऑप्शन निवडू शकतात. त्याचसोबत राज्य सराकरने आपल्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून आणि पालकांच्या परवानगीसह शाळा सुरु करु शकतात. कोणत्याही विद्यार्थ्यांना जबरदस्ती करुन शाळांमध्ये बोलावू नये. SOP ही दोन टप्प्यात आहे. पहिला म्हणजे शाळा सुरु केल्याच्या वेळी आरोग्याची सुरक्षेसंबंधित आहे. तर दुसरा शारिरिक/सामाजिक भेदासह शिकणे.(COVID-19 Vaccine Update: जुलै 2021 पर्यंत 400-500 मिलीयन लसीचे डोस सुमारे 25 कोटी लोकांना पुरवण्याचे लक्ष्य- आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन)
>> 'या' अटीशर्थींसह शाळा सुरु होणार:
-शाळा पुन्हा सुरु केल्यानंतर कोणतीही एसेसमेंट टेस्ट घेतली जाऊ नये.
-विद्यार्थ्यांना पालकांच्या परवानगी शिवाय शाळेत जाता येणार नाही आहे.
-आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाच्या SOP च्या आधारावर राज्यांना आपली स्वत:ची SOP तयारी करावी लागणार आहे.
-सर्व विद्यार्थी आणि स्टाफला प्रत्येक वेळी चेहरा झाकणे किंवा मास्क घालूनच शाळेत प्रवेश करावा लागणार आहे.
-ऑनलाईन/डिस्टेंस लर्निंगचा प्राथिमकता आणि प्रोत्साहन.
-हजेरीच्या निकषात लवचिकता असेल. विद्यार्थी शारिरीक रुपात उपस्थिती राहण्याऐवजी ऑनलाईन वर्ग सुरु करण्याचा ऑप्शन निवडू शकता.
-शाळांमध्ये मिड-डे मिल तयार करताना आणि देते वेळी खबरदारी घ्यावी.
-शाळांमधील सर्व परिसर, फर्निचर, वस्तू. वॉटर टँक, स्टेशनरी, स्टोरेज प्लेस, कॅन्टिन, वॉशरुन, लॅब, लायब्ररी सातत्याने स्वच्छ करावे. त्याचसोबत त्याचे निर्जंतुकीकरण सुद्धा करावे.
-बसण्या संदर्भातील सुचना सांगताना सोशल/फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करावे. कोणतेही सोहळे किंवा कार्यक्रम टाळा.
तर 30 सप्टेंबरला गृह मंत्रालयाकडून अनलॉक-5 च्या मार्गदर्शक सुचनांनुसार देशातील विविध राज्य सरकारने 15 ऑक्टोंबर पासून क्रमबद्ध पद्धतीने शाळा सुरु करण्याची परवानगी द्यावी. तसेच प्रत्येक राज्याला शाळा कधी सुरु करण्यात यावी याचा निर्णय घेण्याची परवानगी असणार आहे. अनलॉक-5 च्या मार्गदर्शक नियमांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना वर्गात येता येणार आहे.