Coronavirus: नोटांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो का? आरबीआयने दिली 'अशी' माहिती
(File Photo))

कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याचपार्श्वभूमीवर नोटांपासून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का? असा पश्न कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सकडून (CAIT) रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला (RBI) विचारण्यात आला होता. याबाबत आरबीआयने स्पष्टीकरण दिले आहे. तसेच नोटांपासूनदेखील कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांनी शक्यतो डिजिटल पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण करावी, असा सल्लादेखील आरबीआयने दिला आहे.

कॅटने 9 मार्च रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना एक पत्र पाठवले होते. नोटांपासून बॅक्टिरीया किंवा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का? याबाबत स्पष्टीकरण देण्यास आग्रह केला होता. त्यानंतर अर्थ मंत्रालयाने याबाबत आयबीआयकडे विचारणा केली होती. यावर आयबीआयने आपले स्पष्टीकरण दिले आहे. तसेच नोटांपासून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोना महामारीसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी मोबाईल बॅंकीग, इटरनेट बॅंकींग, कार्ड यांसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करू शकतात, असेही आरबीआयने म्हटले आहे. हे देखील वाचा- Bitcoin: बिटकॉइन, प्रत्यक्षात नसलेले पण अस्तित्वात असलेले चलन, 'या' 5 देशांत Cryptocurrency आहे अधिकृत, मार्केटमध्ये होतात मोठमोठे व्यवहार, घ्या जाणून

भारतात कोरोनाबाधितांची संखया झपाट्याने वाढू लागली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 65 लाख 49 हजार 374 वर पोहचली आहे. यापैकी 1 लाख 1 हजार 782 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 55 लाख 9 हजार 967 जणांनी कोरोनावर मात केली आहे.