Flight (Photo Credits: Pixabay)

मार्च महिन्यापासून ठप्प असलेली प्रवासी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 15 जुलै पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय भारत सरकारने आज जाहीर केला आहे. या काळात प्रवासी विमानांनी भारतीयांना परदेशात जाण्याची किंवा परतण्याची सोय नसेल. अशी माहिती DGCA कडून देण्यात आली आहे. दरम्यान भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतामध्ये लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू आहे. मात्र या लॉकडाऊनमध्ये हळूहळू काही गोष्टींवरील बंदी उठवण्यात आली आहे. मात्र अद्याप आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. DGCA ने कार्गो आणि अन्य पूर्व परवानगी असलेल्या विमानांची उड्डाणं रोखलेली नाहीत.

परदेशामध्ये अडकलेल्या भारतीयांना,पर्यटकांसाठी मात्र सध्या वंदे भारत ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जगभरातून भारतीयांची परदेशातून सुटका केली जात आहे. दरम्यान देशामध्ये डोमेस्टिक फ्लाईट्सना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार पुरेशी खबरदारी घेत आता देशांर्गत प्रवास करता येऊ शकतो. Domestic Flights Guidelines: देशात आज पासून देशांतर्गत विमान सेवा सुरु; महाराष्ट्र सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सुचना.

ANI Tweet

आज भारतामध्ये मागील 24 तासांत कोविड-19 चे 17,296 नवे रुग्ण समोर आले आहेत, तर 407 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारतातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 4,90,401 वर पोहचला आहे. त्यापैकी 1,89,463 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 2,85,637 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे ठीक झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.