
देशातील सर्वात मोठी एसबीआय (SBI) बँकेने पेन्शन धारकांना 30 नोव्हेंबर पर्यंत त्यांचे लाइफ सर्टिफिकेट (Life Certificate) फॉर्म भरण्यासाठी सुचना दिली आहे. म्हणजेच जर तुम्ही सेवानिवृत्त झाले असल्यात आणि तुमची पेन्शन एसबीआय बँकेत येत असल्याने तुम्हाला लाइफ सर्टिफिकेट देणे अत्यावश्यक आहे. बँकेकडून जाहीर करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार असे सांगितले आहे की, पेन्शन धारकांना त्यांचे लाइफ सर्टिफिकेट नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपूर्वी बँकेत द्यावे लागणार आहे. त्यामुळे जर एखाद्या ग्राहकाने ते दिल्यास बँकेत जमा होणारी पेन्शन बाबत अडथळा निर्माण होऊ शकतो. देशभरात एसबीआय बँकेत सर्वाधिक पेन्शन धारक ग्राहक आहेत.
एसबीआयने हे सर्टिफिकेट देण्यासाठी खास सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. बँकेकडून ट्वीट करत याबाबत असे सांगितले आहे की, पेन्शन खातेधारकाने कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन लाइफ सर्टिफिकेट जमा करता येणार आहे. त्याचसोबत सरकारी अॅप उमंगच्या माध्यमातून सुद्धा बी सर्टिफिकेट जमा करता येणार आहे. त्याचसोबत CSC म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर मध्ये सुद्धा जमा करु शकता.(EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता स्वत:च जनरेट करु शकणार UAN क्रमांक, जाणून घ्या फायदे)
मात्र जर तुम्ही एसबीआयमध्ये लाइफ सर्टिफिकेट जमा न केल्यास तुमच्या खात्यामधील जमा झालेली पेन्शन तुम्हाला काढता येणार नाही. त्यामुळेच नोव्हेंबर महिना संपण्यापूर्वी लाइफ सर्टिफिकेट बँकेत जमा करावे असे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे. तसेच जर तुम्ही काही कारणामुळे जाऊ शकत नसल्यात तुमच्याद्वारे एखाद्या अधिकृत व्यक्तीकडे ते सर्टिफिकेट जमा करण्यासाठी पाठवून देऊ शकता.