कर्मचारी भविष्य निधी संगठन (EPFO) यांनी शुक्रवारी औपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता त्यांचा युएन (UAN) क्रमांक स्वत:च जनरेट करण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने युएन क्रमांक मिळू शकणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना युएन क्रमांकासाठी नोकरीवर नियुक्त केलेल्या व्यक्तीकडे अर्ज द्यावा लागणार नाही आहे. ईपीएफओ यांच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ही माहिती देण्यात आली आहे.
ईपीओएफच्या या निर्णयाचा फायदा असा होणार आहे की, कर्मचाऱ्यांची नियुक्त करणारा व्यक्ती त्यांची संख्या किती आहे ते लपवू शकणार नाही आहे. सेंट्रल प्रोव्हिडंट फंड कमिश्नर सुनील बर्थवाल यांनी असे सांगितले की, आता कोणत्याही कर्मचाऱ्याला EPFO संकेतस्थळावर जाऊन स्वत: UN क्रमांक मिळवू शकणार आहे. या युएन क्रमांकामध्ये कर्मचाऱ्याचा प्रोव्हिडंट फंड, पेन्शन आणि जीवन बीमा संबंधित अधिक माहिती दिलेली असणार आहे.(7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यानंतर आता 'या' शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता आणि DA मध्ये वाढ)
लक्षात असू द्या की, ईपीएओच्या मते कोणतीही औपचारिक कंपनी, जेथे 20 लोकांपेक्षा अधिक जण काम करतात. त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना ईपीएफओ च्या माध्यमातून सामाजिक सुरक्षितता देणे आवश्यक आहे. ईपीएफओच्या खात्यात कर्मचारी आणि नियुक्ती करणाऱ्या व्यक्तीचे 12-12% योगदान असते. मात्र काही कंपन्या त्यांच्या येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी योग्य माहिती देत नाहीत. परंतु आता हे शक्य होणार नाही आहे. त्याचसोबत ईपीएओने 65 लाख पेन्शनधारकांसाठी पेन्शन गुंतवणूकीसारखी अन्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.