7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यानंतर आता 'या' शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता आणि DA मध्ये वाढ
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली. त्यानंतर आता अन्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे. माजी शासकीय कर्मचाऱ्यांच्या डीए (DA) मध्ये 5 टक्क्यांनी वाढ केल्याने त्याचा फायदा सातवा वेतन आयोगाच्या अंतर्गत येणार आहे. म्हणजेच त्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या नुसार वेतन देण्यात येणार आहे. हे वेतन फक्त ज्या कर्मचाऱ्यांच्या 5 टक्क्यांनी डीए वाढवून दिला आहे.

सध्या सरकारने सहाव्या वेतन आयोगनुसार वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना सुद्धा 10 टक्क्यांनी डीए मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 154 टक्क्यांनी वाढवून 164 टक्के करण्यात येणार आहे. मात्र अद्याप याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र याबाबत लवकरत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.(7th Pay Commission: भारतीय तटरक्षक दलात नाविक पदासाठी भरती; पात्र उमेदवारांना मिळणार 21,700 रुपये ची वेतनश्रेणी, joinindiancoastguard.gov.in करा ऑनलाईन अर्ज)

सातवा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त काही राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सुद्धा लागू करण्यात आला आहे. तर काही राज्य असे ही आहेत त्यांना सहाव्या वेतनानुसार पगार दिला जातो. त्यामध्ये पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेशासह साउथ इंडियातील काही राज्य सहभागी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने केंद्र कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना महागाई भत्ता 12 टक्क्याहून 17 टक्के केला. त्यानंतर काही राज्यातील प्रदेशात सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये सुद्धा वाढ केली आहे.