7th Pay Commission: भारतीय तटरक्षक दलात नाविक पदासाठी भरती; पात्र उमेदवारांना मिळणार 21,700 रुपये ची वेतनश्रेणी, joinindiancoastguard.gov.in करा ऑनलाईन अर्ज
Indian currency notes (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

सध्याच्या काळात सरकारी नोकरी मिळणं म्हणजे महाअवघड होऊन बसले आहे. त्यात जर चुकून-माकून नोकरी मिळाली तरीही तर सध्या निवृत्त होणा-या लोकांना जो सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू झाला आहे तो लागू होत नाही. मात्र भारतीय तटरक्षक दलात नाविक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना हा लाभ घेता येणार आहे. भारतीय तटरक्षक दलात नाविक पदासाठी भरती आहे. यात निवडक उमेदवारास सातव्या वेतन आयोगानुसार, 21,700 रुपये इतकी वेतनश्रेणी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही संधी न दवडता लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करावे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 30 ऑक्टोबरपासून सुरु झाले असून 8 नोव्हेंबर 2019 ला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरता येतील.

त्याचबरोबर भारतीय तटरक्षक दलाने सांगितले आहे की, केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्विकारण्यात येतील. त्यामुळे इच्छुकांनी ही संधी दवडता कामा नये. तसेच सविस्तर माहिती येथे दिलेल्या लिंकव वर करा.

नाविक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता:

1. उमेदवार हा कमीत कमी 10 वी पास असावा. त्यात त्याला 50% किंवा त्याहून जास्त टक्के असावे.

2. SC आणि ST उमेदवारांसाठी 5% कमी असून त्यांना कमीत कमी 45% असणे अनिवार्य आहे.

3. तसेच खेळ, क्रिडा, राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठीही 45% अट ठेवण्यात आली आहे. 7th Pay Commission: दिवळीआधीच दिवाळी, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार! मिळणार बक्कळ बोनस, महागाई भत्ता, 26 महिन्यांची थकबाकी

वयाची पात्रता:

1. उमेदवाराचे वय हे 1 एप्रिल 2020 पर्यंत कमीत कमी 18 ते 22 वर्ष असणे गरजेचे आहे.

2. तर SC किंवा ST उमेदवारांना 5 वर्ष ज्यादा ची सूट देण्यात आली आहे.

3. तसेच OBC साठी 3 वर्ष ज्यादाची सूट देण्यात आली आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार, नाविकाला वेतनश्रेणी मिळणे ही खरच खूप महत्त्वाची आणि फायद्याची गोष्ट आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना जराही वेळ न दवडता या पदासाठी अर्ज करावे असे सांगण्यात येत आहे.