Raped (representationla image)

उत्तर प्रदेश राज्यातील (Uttar Pradesh) बिजनौर (Heinous Robbery in Bijnor) येथील नगीना येथे मंगळवारी रात्री पाच दरोडेखोरांच्या टोळीने एका व्यावसायिकाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकला आहे. दरोडेखोरांनी व्यावासायिकाच्या घरातून सोने 291.5 ग्रॅम सोने, एक स्कूटर, एक एलईडी टीव्ही आणि दीड लाख रुपयांची रोकड लंपास केली. मात्र धक्कादायक असे की, दरोड्याच्या वेळी घरात असलेल्या व्यापाऱ्याच्या पत्नीवर त्यांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. तसेच तिला मारहाण करुन गंभीररित्या जखमीही केले. घडल्या प्रकारामुळे बिजनौर हादरुन गेले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तपासही सुरु केला आहे.

घटनेबाबत माहिती अशी की, व्यापारी आपल्या मुलांसह आईसह धामपूरला आपल्या बहिणीच्या घरी भाऊबीज साजरा करण्यासाठी गेला होता. या वेळी त्याची पत्नी नगीना येथील घरी एकटीच होती. घरी कोणी नसल्याने पत्नी आपली कामे आटोपून झोपी गेली. तिला असे काही घडेल याची सूतराम कल्पना नव्हती. परिस्थितीचा फायदा घेत हल्लेखोरांनी शेजारच्या गच्चीतून घरात प्रवेश केला. पत्नीला ज्या वेळी जाग आली तेव्हा तिला दरोडेखोरांनी बंदी बनवून बांधल्याचे आढळून आले. त्यांनी प्रचंड नशा केली होती. गुन्हेगारांनी घरातील वस्तूंवर हात साफ केल्यानंतर तिच्या आब्रूला हात घातला. त्यांनी तिच्या हातावर, मानेवर सिगारेटचे चटके दिले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच, घरातून पळ काढताना तिचा गळा दाबून ठार मारण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.

दरडेखोर घरातून पसार झाल्यानंतर महिलेने कसेबसे स्वत:ला सावरले. तिने शाजाऱ्यांकडून फोन घेत आपल्या पतीशी संपर्क साधला. त्यानंतर तातडीने हालचाल झाली. पोलिसांनाही घटनेची माहिती मिळाली. महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एक्स पोस्ट

दरम्यान, पीडितेने बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास लुटल्याची प्राथमिक तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा ताखल करत तातडीने तपास सुरू केला. अधिक तपासात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तक्रारीत बदल करून पोलिसांनी दरोडा आणि सामूहिक बलात्काराच्या आरोपांचा समावेश केला. पोलिसांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, दरोडेखोर अद्यापही फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. लवकरच त्यांना पकडण्यात येईल. त्यानंतर त्यांच्याकडून सदर गुन्हा आणि इतर गुन्ह्यांबाबतही तपशील मिळवला जाईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.