Gangrape | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील आग्रा (Agra) येथे अपहरण केलेल्या अवघ्या 15 वर्षीय मुलीवर तिघांनी रिक्षातून अपहरण केल्यानंतर सामूहिक बलात्कार (Agra Gangrape Case) केल्याची घटना पुढे येत आहे. यातील एका आरोपीने पोलीस कारवाई आणि अटक होण्याच्या भीतीतून आत्महत्या केल्याचेही समजते. अल्पवयीन पीडितेसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे केवळ खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाईस सुरुवात केली आहे.

आग्रा पोलिसांच्या हवाल्याने वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अल्पवयीन मुलगी वडिलांच्या दुकानातून घरी परतताना आरोपींनी सोमवारी तिचे अपहरण केले. दुचाकीवरुन आलेल्या एका अनोखळी माणसाने प्रथम तिच्याशी अरेरावीत संवाद सुरु केला. त्यानंततर त्यांने तिला धमकावले. दरम्यान, तिथे आलेल्या ऑटोरिक्षामध्ये तिला जबरदस्तीने ढकलण्यात आले. दुसऱ्या दिवशी ती एका विटभट्टी व्यवस्थापकाला असहाय अवस्थेत आढळून आली. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार तिच्या वडीलांशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली.

पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच एका आरोपीने अटक होण्याच्या भीतीने गळफास लावून आत्महत्या केली. तर दुसऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. रूपेश, कारुआ आणि जगदीश (वय 18 ते 20 दरम्यान) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलमांखाली आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर नोंदवण्यात आला. आरोपी शमशाबाद परिसरातील गावातील रहिवासी आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त अनंत कुमार पांडेय यांनी सांगितले की, ऑटोरिक्षाच्या माध्यमातून आरोपींनी पिडितेचे अपहरण केले. नंतर गावाजवळील आडराणात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासासाठी आम्ही जेव्हा आरोपींच्या गावी गेले तेव्हा त्यातील एका आरोपीने गळफास घेत आत्महत्या केली होती.

दरम्यान, आरोपी ऑटोरिक्षा चालक रूपेशला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. करुणाला अटक करण्यासाठी सहा पथकांना सांगण्यात आले आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे, तर जगदीशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.