Kidnapping News: अवघ्या ५ वर्षाच्या मुलीचे अपहरण (Kidnapping) केल्या प्रकरणी जूहू पोलिसांनी शुक्रवारी आरोपीला अटक केले आहे. जुहू पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या जवळच्या मित्राच्या ५ वर्षाच्या मुलीचे अपहरण केले. विलेपार्ले येथून मुलीला राहत्या घरातून अपहरण केले. अजित पवार असं आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे विलेपार्ले परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलीसांना ही माहिती देताच त्यांनी अवघ्या 48 तासांत त्यांनी आरोपीसह मुलीला ताब्यात घेतले.पीडित मुलीला घरांकडे सोपवण्यात आले आहे.
आरोपीने दोन दिवसांपुर्वी कामाला न जाता मित्राच्या घरी आला. आजारपणाचे नाटक करत तो त्यांच्या घरी राहिला. मुलीशी जवळीक साधून तिला बाहेर चॉकलेट घेण्यासाठी घेवून गेला. घरात मुलीची आई होती. बराच वेळ मुलगी घरी परतली नाही म्हणून आईने बाहेर जावून शोध घेतला. काही तासांनी दोघे ही आरोपी आणि मुलगी परिसरात नसल्याचे कळून आले. मुलीच्या आईने तीच्या घरात या गोष्टीची कल्पना दिली तेव्हा कुटूंबांनी पोलीसांत तक्रार केली.
विलेपार्ले पोलीसांनी या घटनेची नोंद घेतली. परिसरात येवून सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मुंबईतील घाटकोपर, वांद्रा,अंधेरी आणि चिंचपोकळी या ठिकाणी पोलीसांनी पथके तयार केली. अवघ्या ४८तासांत पोलीसांनी आरोपीला अटक केली. जोगेश्वरी येथून जूहू पोलीसांना आरोपीला मुलीसोबत ताब्यात घेतले.सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने आरोपी पोलीसांच्या ताब्यात आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.