महागाईच्या दराने गेल्या 5 वर्षातील उच्चांक गाठत 7.35 टक्क्यांवर पोहचला
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Videoblocks)

महागाईच्या काळात अजून एक वाईट बातमी आहे. कारण खरंतर थंडीच्या दिवसात किरकोळ महागाई दर कमी असतो. मात्र यावेळेस किरकोळ महागाई दराचा फटका बसला आहे. हा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या वर्षात डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाई दराने 5 वर्षातील उच्चांक गाठत रेकॉर्डब्रेक केला आहे. डिसेंबर महिन्यात दर 7.35 टक्क्यांच्या स्तरावर पोहचला आहे. तर खाण्यापिण्याच्या वस्तूंवरील महागाई दर 14.2 टक्के झाला आहे.

गेल्या वर्षात किरकोळ महागाई दर 5.54 टक्के होता. मुख्य कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या किंमतीत होणाऱ्या वाढीचा परिणाम झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात हा आकडा 10.01 टक्के होता. महागाई दराच्या रेकॉर्डबाबत बोलायचे झाल्यास जुलै 2014 मध्ये आकडा 7.39 टक्के होता. जुलै 2014 नंतर पहिल्यांदाच महागाई दराचा आकडा डिसेंबर 2019 मध्ये 7.35 टक्के झाल्याचे समोर आले आहे. खरंतर थंडीच्या दिवसात खासकरुन भाज्यांच्या किंमती कमी होतात. मात्र यंदा खाण्यापिण्यासह भाज्यांचे दर ही वाढले आहेत.(जनगणना 2021 ची तयारी सुरु; नागरिकांना द्यावी लागणार या 31 प्रश्नांची उत्तरे)

केंद्र सरकारचे लक्ष महागाई दर हा नेहमीच 4 टक्क्यांपर्यंत ठेवण्याचे असते. यामध्ये 2 टक्के मार्जिन आहे. म्हणजेच महागाई दर 6 टक्क्यांपेक्षा अधिक नसावा. आरबीआय किरकोळ महागाई दर लक्षात घेऊन मॉनिटरी पॉलिसीची घोषणा करतात.डिसेंबरमध्ये मॉनिटरी पॉलिसीमध्ये व्याज दरातील कपात करण्याच्या मागे आरबीआयने वाढता महागाई दर असल्याचे कारण दिले आहे. मात्र जर आरबीआयने वाढत्या महागाईवर तोडगा न काढल्यास त्यांना व्याजर दरात वाढ करणे भाग पडणार आहे.