जनगणना 2021 ची तयारी सुरु; नागरिकांना द्यावी लागणार या 31 प्रश्नांची उत्तरे
Census-India-2021 (Photo Credit: Twitter)

भारतात दर दहा वर्षांनी जनगणना करुन नागरिकांची माहिती घेतली  जाते. देशात गेल्या दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 साली जनगणना करण्यात आली होती. या प्रक्रियेला दहा वर्षपूर्ण झाली असून 2020 मध्ये पुन्हा जनगणनेचे (Census 2021) काम सुरु होणार आहे. तसेच येत्या 1 एप्रिलपासून सरकारी अधिकारी आपल्या घरी येऊन आपली संपूर्ण माहिती गोळा करणार आहेत. या माहितीमध्ये सरकारी अधिकारी आपल्या कुटूंबाच्या प्रमुखांचा मोबाइल नंबर, शौचालय, टीव्ही, इंटरनेट, वाहने, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत इत्यादींशी संबंधित प्रश्न विचारतील. मोबाईल क्रमांक फक्त जनगणनेच्या उद्देशाने विचारला जाणार आहे. तसेच इतर कोणत्याही हेतूसाठी तो वापरला जाणार नाही, अशी माहिती सरकारच्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आली आहे. हे देखील वाचा- देशात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्येत वाढ: राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून 2018 मधील आकडेवारी जाहीर; पहा धक्कादायक वास्तव

जनगणना दरम्यान विचारले जाणारे प्रश्न-

1) इमारत क्रमांक (नगरपालिका किंवा स्थानिक प्राधिकरण क्रमांक)

2) सेन्सेस घर क्रमांक

3) घर बांधताना किती मटिरिअल लागले?

4) घराचा वापर कोणत्या उद्देशाने केला जातो?

5) घराची सध्याची स्थिती?

6) घर क्रमांक?

7) घरात राहणाऱ्यांची संख्या?

8) कुंटूब प्रमुखाचे नाव?

9) कुटूंब प्रमुखाचे लिंग?

10) घराचे प्रमुख अनुसूचित जाती / जमाती किंवा इतर समुदायाचे आहेत काय?

11) घराचा मालकी हक्क कोणाकडे आहे?

12) घरात कीती खोल्या आहेत?

13) घरात किती विवाहित जोडप राहतात?

14) पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत?

15) घरात पाणी स्त्रोताची उपलब्धता?

16) विजेचा मुख्य स्रोत

17) शौचालय आहे की नाही?

18) कोणत्या प्रकारचे शौचालय आहे?

19) ड्रेनेज सिस्टम

20) आंघोळीसाठी बाथरूम आहे की नाही?

21) स्वयंपाकघर आहे की नाही? यात एलपीजी / पीएनजी कनेक्शन आहे की नाही?

22) स्वयंपाक घरात वापरले जाणारे इंधन?

23) घरात रेडिओ / ट्रान्झिस्टर की नाही?

24) घरात दुरदर्शन आहे की नाही?

25) इंटरनेट सुविधा आहे की नाही?

26) लॅपटॉप / संगणक आहे की नाही?

27) टेलिफोन / मोबाईल फोन / स्मार्टफोनचा वापर करतात की नाही?

28) तुमच्याकडे सायकल / स्कूटर / मोटरसायकल / मोपेड आहे की नाही?

29) तुमच्याकडे कार / जीप / व्हॅन आहे की नाही?

30) घरात कोणत्या धान्याचा मुख्यता: वापर केला जातो?

31) मोबाइल नंबर

यावेळी जनगणना पेन आणि कागदाऐवजी मोबाईलमधील एका अॅप्लिकेशनद्वारे ही जनगणना करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, जनगणना माहिती विचारताना बॅंकेच्या निगडीत कोणतीही माहिती देऊ नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. यामुळे वरील प्रश्नांची यादी सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे.