नरेंद्र मोदी सरकारने दागिने/सोन्याबाबत (Gold) आता नवीन घोषणा केली आहे. आता आपण आपल्या घरात निश्चित मर्यादेपेक्षा जास्त सोने ठेवू शकणार नाही. ही मर्यादा महिला आणि पुरुष दोघांसाठीही वेगळी आहे. मात्र तुमच्या घरात आधीपासूनच असलेल्या सोन्यावर कोणत्याही प्रकारचा निर्बंध लादला जाणार नाही. याबाबतचा नियम पूर्वीसारखाच आहे, अर्थ मंत्रालयाने केलेल्या घोषणेनुसार, आता विवाहित स्त्री स्वतःकडे 500 ग्रॅम पर्यंत सोने बाळगू शकते. अविवाहित महिला 250 ग्रॅम सोने बाळगू शकतात, तर पुरुष स्वतःकडे 100 ग्रॅम सोने बाळगू शकतील.
भारतीयांना सोन्याशी खास लगाव आहे, मग ते लग्नाच्या निमित्ताने असो, वा एखाद्याला भेटवस्तू द्यायची असो. सणासुदीला किंवा गुंतवणूक करण्यासाठी सोने खरेदी केली जाते. मात्र आपण सोन्याशी संबंधित कर नियमांकडे दुर्लक्ष करतो. यामुळेच प्राप्तिकर विभागाकडून बर्याच वेळा नोटीस आली, तर आपल्याला दंड भरावा लागतो. चला पाहूया सोन्याशी संबंधित आयकर नियमांबद्दल
घरी सोने ठेवण्याची मर्यादा -
> घरात सोने ठेवण्याची काही मर्यादा नाही. मात्र सोने खरेदी करण्यासाठी पक्के बिल असणे आवश्यक आहे. प्राप्तिकर विभागाच्या चौकशीनंतर हेच बिल उपयोगी पडेल.
> वर्षाकाठी 50 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास, घरात ठेवलेल्या सोन्याच्या किंमतीबद्दल आयकर विभागाला माहिती द्यावी लागते. परताव्यामध्ये मालमत्ता आणि उत्तरदायित्वाच्या पर्यायामध्ये सोन्याच्या किंमती नमूद करा. (हेही वाचा: Gold Shopping: सोने खरेदी करत असाल तर हा नवा नियम नक्की वाचा; बनावट सोने ओळखणे आता होणार सोपे)
दरम्यान, भारतीय सोन्यासाठी BIS हॉल मार्किंग अनिवार्य (BIS Hallmarking for Gold Jewelry) करण्यात आलेले आहे. जर का आपण हॉलमार्किंगवाले सोने खरेदी केले नही, तर आपणास शिक्षेची तरतूद केली गेली आहे. 1 लाख रुपये दंड आणि 1 वर्षापर्यंत शिक्षा असे याचे स्वरूप आहे.