Gold Shopping: सोने खरेदी करत असाल तर हा नवा नियम नक्की वाचा; बनावट सोने ओळखणे आता होणार सोपे
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सोन्याच्या दुकानांमध्ये अगदी ग्राहकांची झूबंड पाहायला मिळते. पण खरेदी केलेले सोने बनावट तर नाही ना हे तपासायचे कसे असा विचार जर तुम्ही करत असाल तर त्यावर सरकारने एक नवा नियम लागू करणार आहे. या नव्या नियमामुळे बनावट सोने विक्रीवर आळा घालून फक्त शुद्ध सोनेच बाजारात विक्रीस उपलब्ध होणार आहे.

हा नवा नियम काय ?

भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ही देशातील एकमेव एजन्सी आहे ज्यांना सोन्याचे दागिने हॉलमार्किंगला मान्यता आहे. आता नव्या नियमानुसार 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेट असं सोन्यासाठी हॉलमार्किंग निश्चित करण्यात आलं आहे. सध्या आपल्या देशात ग्राहकांच्या इच्छेनुसार हॉलमार्क दागिणे दिले जातात. परंतु नवा नियम लागू झाल्यानंतर सराफांना हॉलमार्क असलेले दागिने विकणेच बंधनकारक असेल. यामुळे दागिण्यांच्या बनावट दागिने विकून ग्राहकांची फसवणूक थांबणार आहे व ग्राहकांना यांचा फायदा होणार आहे.

हा नवा नियम कधीपासून लागू करण्यात येणार?

सरकारने जाहीर केल्यानुसार हा नवा नियम पुढील २ ते ३ महिन्यांत विहित प्रक्रियेअंतर्गत लागू करण्यात येणार आहे. सध्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग ग्राहकाच्या इच्छेनुसार करण्यात येते. परंतु हा नवा नियम लागू होताच, सर्व दागिन्यांच्या विक्रीपूर्वी हॉलमार्किंग घेणे बंधनकारक असेल.

हॉलमार्किंग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाला मंत्रालयाच्या वाणिज्य खात्याने मान्यता दिली असून हा प्रस्ताव १ ऑक्टोबर रोजी मंजूर झाला. लगेचच तो प्रस्ताव जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूटीओ) पाठवण्यात आला असून डब्ल्यूटीओच्या मंजुरीनंतरच याची अंमलबजावणी होईल.