![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/03/Coronavirus-vaccine-380x214.jpg)
देशात कोविशिल्ड (Covishield) लसीच्या दोन डोस मधील अंतर कमी करण्याचा विचार केला जात आहे. सरकारच्या सुत्रांनुसार, ही माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की भारतातीव लसीकरणावर राष्ट्रीय तंत्रज्ञान सल्लागार समूहाकडून लवकरच चर्चा केली जाणार आहे. लक्षात असू द्या की, देशात कोविशील्डच्या लसीसाठी सुरुवातीला दोन डोस मधील अंतर चार ते सहा आठवडे ठेवण्यात आले होते. मात्र नंतर ते चार ते आठ आठवडे केले गेले. त्यानंतर पुन्हा 12-16 आठवडे अंतर केले गेले.
डोस मधील अंतर वाढवण्यामागे सरकारचे असे म्हणणे होते की, कोविशिल्ड अधिक प्रभावी असल्याने तो निर्णय घेण्यात आला होता. विशेषतज्ञांच्या हवालानुसार, सरकारचे असे म्हणणे होते की दोन डोस मधील अंतर अधिक ठेवल्यास कोरोनाच्या विरोधात लढण्याऱ्या अँटीबॉडीज अधिक तयार होतात.(7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्यांचा DA 31% झाल्यास पगारात होणार मोठी वाढ; इथे पहा किती होणार फायदा!)
Tweet:
Reduction in the gap between two doses of COVISHIELD is being considered and it will be further discussed in NTAGI (National Technical Advisory Group on Immunisation in India): Government Sources#COVID19
— ANI (@ANI) August 26, 2021
दरम्यान, भारतात कोविशिल्डची निर्मिती सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया कडून केली जात आहे. अधिकृत सुत्रांनी असे म्हटले की, सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाने केंद्र सरकारला सुचित केले आहे की, सप्टेंबर मध्ये भारत सरकार आणि खासगी रुग्णालयात कोविशिल्ड लसीचे जवळजवळ 20 कोटी डोस दिले जाणार आहेत. पुणे स्थित सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाने ऑगस्टमध्ये कोविशिल्डचे 12 कोटी डोस दिले आहेत. एसआयआय मधील निर्देशक प्रकाश कुमार सिंह यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला असे म्हटले की, कंपनीने उत्पादन क्षमता वाढवली आहे.
केंद्र सरकारने नुकत्याच पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत असे म्हटले आहे की, आतापर्यंत देशभरात 46.69 कोटी लोकांना कोविड लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. देशात एकूण 60 कोटींहून अधिक लसीचे डोस दिले गेले आहेत. 13.70 कोटी लोकांना दुसरा डोस सुद्धा दिला गेला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 46 हजार नवी प्रकरण समोर आली आहेत. यामधील 58 टक्के रुग्ण हे केरळातील असल्याचे सांगण्यात आले आहे.