केंद्रीय कर्मचार्यांना आता सणांच्या धामधूमीमध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यामध्ये वाढ (DA Hike) मिळण्याची शक्यता आहे. 1 जुलै 2021 पासून केंद्रीय कर्मचार्यांचा आणि निवृत्तीवेतन धारकांचा डीए 28% झाला आहे. जुलैच्या पगारात तो देण्यातही आला. आता कर्मचार्यांना जून 2021 च्या महागाई भत्त्याची प्रतिक्षा आहे. काही मीडीया रिपोर्ट्सनुसार, सरकार लवकरच जूनच्या महागाई भत्त्याची देखील घोषणा करू शकते. तसे झाल्या आता कर्मचार्यांचा महागाई भत्ता 28% वरून 31% होऊ शकतो आणि कर्मचार्यांच्या पगारात पुन्हा मोठी वाढ होऊ शकेल. 7th Pay Commission अंतर्गत येणार्या कर्मचार्यांनंतर सरकार आता 6th Pay Commission च्या कर्मचार्यांनाही महागाई भत्ता मध्ये वाढ देण्याच्या तयारीत; जाणून घ्या New DA Rate.
जून 2021 च्या महागाई भत्त्याबाबत अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. AICPI जून आकड्यांवरून हे स्पष्ट आहे की 3% वाढ अपेक्षित आहे. JCM सेक्रेटरी (स्टाफ साइड) शिव गोपाल मिश्रा यांच्या माहितीनुसार, सरकार लवकरच त्याची घोषणा करू शकते. जून 2021 मधील AICPI ची आकडेवारी 121.7 वर गेली आहे. यामध्ये 1.1 अंकांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण डीए 31.18 होईल. पण डीए राऊंड फिगर मध्ये देण्याची पद्धत असल्याने तो 31% होईल.
कसा वाढणार पगार?
7th Pay Commission मैट्रिक्स च्या आधारे, केंद्रीय कर्मचार्यांच्या लेवल 1 ची सॅलरी रेंज किमान 18 हजार ते कमाल 56900 आहे. जर 31% डीए झाला तर -
बेसिक सॅलरी 18,000 रुपये
नवा महागाई भत्ता (31%) 5580 रुपये/महीने
आतापर्यंतचा महंगाई भत्ता (28%) 5040 रुपये/महीने
महागाई भत्त्यातील वाढ 5580-5040 = 540 रुपये/महीने
वार्षिक वाढ 540X12= 6480 रुपये
बेसिक सॅलरी 56900 रुपए
नवा महागाई भत्ता (31%) 17639 रुपये/महीने
आतापर्यंतचा महंगाई भत्ता (28%) 15932 रुपये/महीने
महागाई भत्त्यातील वाढ 5580-5040 = 540 रुपये/महीने
17639-15932 = 1707 रुपये /महीने
वार्षिक वाढ 1707X12= 20484 रुपये
दरम्यान केंद्रीय कर्मचार्यांचा डीए प्रत्येक वर्षी दोनदा जानेवारी आणि जुलै महिन्यात वाढतो. मागील दीड वर्षांच्या काळात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 3 डीए फ्रीझ केले होते मात्र आता ते पुन्हा सुरळीत केल्याने केंद्रीय कर्मचार्यांच्या पगारात मोठी वाढ झाली आहे.