7th Pay Commission अंतर्गत येणार्‍या कर्मचार्‍यांनंतर सरकार आता 6th Pay Commission च्या कर्मचार्‍यांनाही महागाई भत्ता मध्ये वाढ देण्याच्या तयारीत; जाणून घ्या New DA Rate
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

केंद्र सरकारने मागील महिन्यात त्यांच्या कर्मचार्‍यांचे आणि निवृत्तीधारकांचे सातव्या वेतन आयोगानुसार पगार असलेल्यांचा डीए (DA) अर्थात महागाई भत्ता वाढवला आहे. 1जुलै 2021 पासून केंद्रीय कर्मचार्‍यांना 28% महागाई भत्ता दिला जात आहे.आता केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाप्रमाणेच (7th Pay Commission) सरकार गिफ्ट देणार आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार, सहाव्या वेतन आयोगानुसार (6th Pay Commission) पगार दिला जाणार्‍यांच्या महागाई भत्ता मध्ये 25% वाढ होण्याची शक्यता आहे. हे केंद्र सरकारचे आणि सेंट्रल अ‍ॅटोनॉमस बॉडी चे कर्मचारी असतील. (नक्की वाचा: 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी, केंद्र सरकारने 'या' योजनेची वाढवली मुदत) .

कोरोना संकटामध्ये जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021 चे महागाई भत्ताचे हफ्ते फ्रीझ करण्यात आले होते. आता 1 जुलै 2021 पासून पुन्हा डीए पूर्ववत करण्यात आले आहेत. आता 6व्या वेतन आतोगातील कर्मचार्‍यांच्या डीए मध्ये देखील 25% वाढ केली जाईल. यापूर्वी 6 व्या वेतन आयोगानुसार पगार असलेल्यांना बेसिकच्या 164% डीए मिळत होता. आता त्यांना 189% डीए मिळणार आहे.

सातव्या वेतन आयोगाप्रमाणेच हा नियम सहाव्या वेतन आयोगासाठी आहे. जून 2020 पर्यंत सातव्या वेतन आयोगाच्या कर्मचार्‍यांना 17% डीए होता पण आता तो वाढून जुलै 2021 पासून 28% केला आहे. केंद्र सरकारने त्यांचेही 3 डीए फ्रीझ केले होते. केंद्र सरकार कडून दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात डीए वाढवला जातो. पण सरकार सप्टेंबर महिन्यात अजून 3% वाढ जाहीर करण्याची शक्यता असल्याचंही रिपोर्ट्समधून समोर आले आहे.