'Red Light On, Gaadi Off': दिल्लीमधील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ट्राफिक सिग्नल्सवर गाडी बंद ठेवण्याचे सरकारचे आवाहन; जनजागृतीसाठी मंत्री गोपाळ राय व इम्रान हुसेन यांची दिल्ली गेटला भेट
Visuals of normal traffic movement in Delhi | (Photo Credits: PTI)

राजधानी दिल्ली (Delhi) मधील वायू प्रदूषण (Air Pollution) हे आजकाल मोठी समस्या बनत चालले आहे. सरकार प्रदूषणावर आळा घालण्यासाठी प्रयत्नशील आहेच, आता याबाबत दिल्लीमध्ये एक नवी मोहीम राबवली जाणार आहे. सिग्नलवर रेड लाईट लागल्यावर लोकांनी आपली वाहने बंद करावीत असे आवाहन दिल्ली सरकारने केले आहे. पर्यावरण मंत्री गोपाळ राय (Environment Minister Gopal Rai) आणि कॅबिनेट मंत्री इम्रान हुसेन (Imran Hussain) यांनी, लोकांनी वाहतुकीच्या सिग्नलवर त्यांची वाहने बंद करावीत यासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी दिल्ली गेट (Delhi Gate) ला भेट दिली. याबाबत गोपाळ राय म्हणाले, 'तुमच्या आसपासच्या पाच लोकांना 'रेड लाईट ऑन, गाडी ऑफ' मोहिमेबद्दल जागरूक करा आणि त्यांना वाहतुकीच्या सिग्नलवर वाहने बंद करण्यास प्रवृत्त करा.’ 2 नोव्हेंबरपासून दिल्लीतल्या सर्व 272 प्रभागांत ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गोपाळ राय यांनी दिली.

दिल्लीच्या लोकांनी यापूर्वी काही स्तुत्य कामे केली आहेत व आता या नव्या मोहिमेद्वारे प्रदूषणाला पराभूत करण्याचा विचार आहे. या मोहिमेबद्दल जनजागृती करण्यासाठी टीम महिला मार्शलनी पुढाकार घेतला आहे. शहरातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी रेड लाईटवर आपले वाहन बंद करून, दिल्लीतील लोक या अभियानात सामील होत असलेली दिसत असल्याचे इम्रान हुसेन यांनी सांगितले. दिल्लीकरांना 'रेड लाईट ऑन, गाडी ऑफ' अभियानात सहभागी होण्यासाठी पर्यावरण मंत्री जनतेला उद्युक्त करीत आहेत. तसेच आपल्यासोबत आपण इतर 5 जणांना या मोहिमेत सामील करून घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

आज दर्यागंजजवळील दिल्ली गेट येथे कॅबिनेट मंत्री श्री इम्रान हुसेन हे देखील गोपाल राय यांच्यासोबत या मोहिमेमध्ये सामील झाले होते. ट्राफिक सिग्नलवर लोकांनी आपली वाहने बंद करावीत याबाबत त्यांनीही जनजागृती केली. या मोहिमेमुळे शहरातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ट्राफिक सिग्नलवर लोक आपली वाहने बंद करत असल्याचे त्यांनी सांगितले.

गोपाळ राय म्हणाले, 'आम्ही दिल्लीतील सर्व ट्रॅफिक सिग्नल क्रॉसिंगवर पर्यावरणविषयक मार्शल तैनात केले आहेत. दिल्ली सरकारच्या या उपक्रमाला लोकांचा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. दिल्लीतील सर्व 70 मतदारसंघात ही मोहीम चालू आहे. येत्या काही दिवसांत, इतर कॅबिनेट मंत्रीही जनजागृती करण्यासाठी प्रभारी असतील. 2 नोव्हेंबरपासून, दिल्लीभरातील सर्व २2२ प्रभागांत मोहीम राबविली जाईल.' या मोहिमेमुळे दिल्लीतील सुमारे 15-20% प्रदूषण कमी होऊ शकते विश्वास गोपाळ राय यांनी व्यक्त केला. (हेही वाचा: Delhi Air Pollution: दिल्ली-NCR मध्ये बिघडली हवेची गुणवत्ता, राजधानीत AQI पोहचला 264 वर)

शहरामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर गोपाळ राय म्हणाले, ‘हा दिवाळीचा हंगाम आहे आणि यावेळी शहरामध्ये वाहतुकीची कोंडी दिसू शकते. परंतु ट्राफिक सिग्नल्सवर आपण आपली बंद ठेऊन मोठ्या प्रमाणावर प्रदूषण कमी करू शकतो.’