Delhi Air Pollution: दिल्ली-NCR मध्ये बिघडली हवेची गुणवत्ता, राजधानीत AQI पोहचला 264 वर
Air Pollution (Photo Credits-ANI)

Delhi Air Pollution: ऑक्टोंबर हिट नंतर आता काही दिवसांनी थंडीचे दिवस सुरु होणार आहेत. मात्र राजधानी दिल्लीतील प्रदुषणाचा स्तर वाढताना दिसून येत आहे. ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीतील हवेत बदल जाणवू लागला आहे. रविवारी दिल्लीत हवेची गुणवत्ता (Air Quality) अत्यंत खराब असल्याचे दिसून आले आहे. दिल्लीतील पॉल्यूसन कंट्रोल कमिटी (DPCC) यांच्या मते, एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 264 वर पोहचला आहे. आज सकळी काही ठिकाणची रेकॉर्ड करण्यात आलेली हवेची गुणवत्ता 200 च्या पार गेल्याचे दिसून आले. ANI यांनी दिलेल्या आयटीओ मध्ये एक्यूआर 264, पटपडगंड येथे 228, आरके पुरम येथे 235 आणि रोहिणी मध्ये 246 वर गेल्याची नोंद करण्यात आली आहे.

अक्षरधाम मधील एका स्थानिक व्यक्तीने म्हटले, अशी बातमी होती की पंजाब येथून हिमालय दिसून येत आहे. आता वायु प्रदुषणासह शहारातील परिस्थिती आधीसारखीच होत चालली आहे. शनिवारी राष्ट्रीय राजधानी मधील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीच्या उच्चांकावर नोंदवली गेली. शहरातील 24 तासातील एकूण हवेची गुणवत्ता (AQI) 197 होता. एका सरकारी पुर्वानुमान एसेंजीने म्हटले की, हवेच्या दिशेत संभाव्य बदल झाल्याने 11ऑक्टोंबरला हवेच्या गुणवत्तेत हलकी सुधारणा दिसून येऊ शकते.(India's GDP: चालू आर्थिक वर्षात 9.6 टक्क्यांनी घसरू शकतो भारताचा जीडीपी; आर्थिक स्थिती अतिशय खराब- World Bank)

दरम्यान, 0-50 मध्ये AQI उत्तम, 51-100 मध्ये मध्यम, 101-200 मध्ये ठीक आणि 201-300 मध्ये खराब आणि 301-400 मध्ये अत्यंत वाईट असल्याचे मानले जाते. त्याचसोबत 401-500 मधील AQI चा आकडा धोकादायक मानला जातो. थंडीचे दिवस सुरु झाले की दिल्लीतील हवा प्रत्येक वर्षी धोक्याच्या पातळीवर पोहचते. गेल्या वर्षात दिल्ली प्रदुषणात वाढ झाल्याचे दिसून आली.

29 जून नंतर 9 ऑक्टोंबरला पहिल्यांदाच हवेची गुणवत्ता ढासळली आहे. या दिवशी AQI 215 नोंद केली होती. 29 जूनला दिल्लीत AQI चा स्तर 230 वर गेला होता. दिल्ली सरकारने समोरवारी मोठ्या स्तराव एँन्टी एअर पॉल्यूशन अभियान सुरु केले आहे. SAFAR यांच्यानुसार सोमवारी पेंढा जाळल्याची 298 प्रकरणे समोर आली होती. सफर यांनी असे म्हटले की, AQI पुढील तीन दिवस बिघडेल अशी अपेक्षा आहे.