Image For Representation (Photo Credits: Facebook)

केंद्र सरकार (Central Government) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank Of India)  वतीने आज, 20 एप्रिल पासून सॉव्हेन गोल्ड बाँड स्कीम (Sovereign Gold Bond Scheme) 2020-21 सुरु करण्यात आली आहे. लॉक डाऊन (Lockdown) काळात अर्थचक्राची थांबलेली गती निदान सुरु व्हावी हा यामागील हेतू आहे. कोरोनामुळे जगावर आर्थिक संकट ओढवले असताना सोने, चांदी व्यापाराकडे  (Gold Investment) सुरक्षित पर्याय म्हणून पहिले जातेय. अशावेळी ग्राहकांना सोन्यात गुंतवणुकीसाठी घरातून बाहेरही पडावे लागणार नाही याची सोय या स्कीम मध्ये करण्यात आली आहे. प्रत्यक्ष सोने खरेदीपेक्षा बॉण्ड च्या माध्यमातून ही गुंतवणूक करता येणार आहे. मोदी सरकार आता निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 20 टक्के कपात करणार? जाणून घ्या यामागील व्हायरल सत्य

दुसरीकडे, यंदा 26 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेचे सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षी या सणाच्या आठवडाभर आधीपासून सोने व्यवसायात तेजी पाहायला मिळते. मागील काही दिवसात सोन्याचे भाव सुद्धा प्रति 10 ग्राम साठी 45 हजाराचा टप्पा पार करून गेले आहेत. अशावेळी ही स्कीम तुम्हाला सोने गुंतवणुकीचा चांगला पर्याय घेऊन आली आहे. सरकारी योजना असल्याने यातील धोका अगदी नगण्य आहे. या स्कीम विषयी सविस्तर जाणून घ्या

सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड स्कीम चे डिटेल्स

-सॉव्हरेन गोल्ड खरेदी करण्यासाठी पहिला टप्पा 20 ते 24 एप्रिल दरम्यान असणार आहे. २ सप्टेंबर पर्यंत ही स्कीम सहा टप्प्यात राबवली जाणार आहे.

-यामध्ये सर्वात कमी म्हणजेच 1 ग्रॅम सोन्याची गुंतवणूक सुद्धा करता येइल.

- गुंतवणूक करताना एक व्यक्ती एका आर्थिक वर्षामध्ये 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकेल.

-या गुंतवणुकीमुळे तुम्हाला करात सवलत तसेच गुंतवणुकीवर वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळणार आहे.

-आठ वर्षापर्यंत ही गुंतवणूक असेल तसेच पाच वर्ष पूर्ण झाल्यावर ग्राहक बॉण्ड मधून बाहेर पडू शकतील.

-Sovereign Gold Bond ची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडक पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होईल.

- यासाठी ऑनलाईन अर्ज आणि खरेदीचे पेमेंट करण्याची मुभा आहे असे केल्यास किमतीवर 50 रुपयांची सूट दिली जाणार आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसच धोका रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. सोबतच ज्या भागात कमी कोरोना रुग्ण आहेत त्याठिकाणी आज पासून काही नियम शिथिल केले गेले आहेत. देशात सध्या कोरोनाच्या रुग्णांचा टप्पा १७ हजारावर पोहचला आहे. अशावेळी निदान देशाची आर्थिक बाजू सबळ करता येईल यासाठी योजना आणण्याचा विचार केला जात आहे.