राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधी वड्रा | (PC - ANI)

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या जामीनास सुरत सत्र न्यायालयाने (Surat Sessions Court) 13 एप्रिल पर्यंत मुदतवाढ (Rahul Gandhi's Bail Extends) दिली आहे. तसेच, राहुल गांधी यांनीदाखल केलेल्या याचिकेवर येत्या 3 मे रोजी सुनावणी होणार आहे. राहुल गांधी यांनी आज (3 एप्रिल ) गुजरातच्या सुरत न्यायालयात सन 2019 मधील मानहानीच्या एका खटल्यातील दंडाधिकारी न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारे अपील दाखल केले. गुजरातमधील दंडाधिकारी न्यायालयाने राहुल यांना मानहानीच्या एका प्रकरणात भाषणादरम्यान 'मोदी' आडनावाचा अपमान केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. तसेच, या प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायदंडाधीकारी न्यायालयाचा निर्णय येताच लोकसभा सचिवालयाने अत्यंत दक्षता दाखवत लगबगीने राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले आहे. राहुल यांनी आता मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे, जेणेकरून त्यांचे लोकसभा सदस्यत्वही बहाल करता येईल. राहुल गांधींसोबत त्यांची बहीण प्रियंका गांधी वढेरा आणि तीन काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री - अशोक गेहलोत, भूपेश बघेल आणि सुखविंदर सिंग सुक्खू हे होते. (हेही वाचा, Rahul Gandhi In Surat Today: राहुल गांधी मानहानी खटल्यातील शिक्षेला देणार गुजरात न्यायालयात आव्हान; प्रियंका गांधीही राहणार उपस्थित)

ट्विट

सूरतमधील एका कोर्टाने 52 वर्षीय राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. सन 2019 मध्ये कर्नाटक राज्यातील कोलार येथून केलेल्या एका जाहीर सभेत राहुल गांधी यांनी फरारी उद्योगपतींवरुन टीका केली होती. तसेच, फरार झालेले सर्व गुन्हेगार मोदीच कसे आहेत? असा सवाल केला होता. यावरुन मोदी समाजाचा (?) अपमान केला असा ठपका राहुल यांच्यावर ठेवत खटला दाखल करण्यात आला होता.

ट्विट

राहुल गांधी यांना शिक्षेविरोधात आपली करण्यासाठी न्यायालयाने 30 दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत ते त्यांना झालेल्या शिक्षेविरोधात वरच्या कोर्टात आव्हान देऊ शकतात. तोपर्यंत राहुल यांना 30 दिवसांचा जामीनही मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे वायनाड येथील लोकसभा सदस्यत्व रद्द केले आहे. परिणामी वायनाडची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी निवडणूक आयोग विशेष पोटनिवडणूक जाहीर करु शकते अशी चर्चा आहे.

ट्विट

दरम्यान, सुरतमध्ये जोरदार सुरक्षा तैनात करण्यात आली होती. खास करुन जिथे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षाच्या नेत्याच्या समर्थनार्थ जिल्हा आणि सत्र न्यायालयाबाहेर जमले होते. "सुरत जिल्हा न्यायालयात राहुल गांधी यांची उपस्थिती लक्षात घेता, सुरत शहर पोलिसांनी जिथे जिथे हालचाल होण्याची शक्यता आहे तिथे पोलिस दल तैनात केले आहे.