Rahul Gandhi In Surat Today: राहुल गांधी मानहानी खटल्यातील शिक्षेला देणार गुजरात न्यायालयात आव्हान; प्रियंका गांधीही राहणार उपस्थित
काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज सुरत दौऱ्यावर आहेत. सन 2019 मध्ये केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी दाखल खटल्यात राहुल यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मानहानीच्या या प्रकरणात दोषी ठरवणारा दंडाधिकारी आदेश रद्द करण्यासाठी राहुल गांधी सुरतच्या (Rahul Gandhi In Surat Today) न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.
काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज सुरत दौऱ्यावर आहेत. सन 2019 मध्ये केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी दाखल खटल्यात राहुल यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मानहानीच्या या प्रकरणात दोषी ठरवणारा दंडाधिकारी आदेश रद्द करण्यासाठी राहुल गांधी सुरतच्या (Rahul Gandhi In Surat Today) न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी मिळालेल्या शिक्षेवर अंतरिम स्थगिती देखील मागू शकतात. ज्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल होण्याचा मार्ग मोकळा होईल.
दरम्यान, राहुल गांधी यांच्यासोबत सूरतमध्ये बहीण प्रियंका गांधी वड्रा आणि अशोक गेहलोत, भूपेश बघेल आणि सुखविंदर सिंग सुखू हे काँग्रेस शासीत तीन राज्यांचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असणार आहेत, असे समजते. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी काल मातोश्री सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. (हेही वाचा, राहुल गांधी मानहानी खटल्यातील शिक्षेला देणार गुजरात न्यायालयात आव्हान)
सूरतमधील एका कोर्टाने 52 वर्षीय राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. सन 2019 मध्ये कर्नाटक राज्यातील कोलार येथून केलेल्या एका जाहीर सभेत राहुल गांधी यांनी फरारी उद्योगपतींवरुन टीका केली होती. तसेच, फरार झालेले सर्व गुन्हेगार मोदीच कसे आहेत? असा सवाल केला होता. यावरुन मोदी समाजाचा (?) अपमान केला असा ठपका राहुल यांच्यावर ठेवत खटला दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, राहुल गांधी यांना शिक्षेविरोधात आपली करण्यासाठी न्यायालयाने 30 दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत ते त्यांना झालेल्या शिक्षेविरोधात वरच्या कोर्टात आव्हान देऊ शकतात. तोपर्यंत राहुल यांना 30 दिवसांचा जामीनही मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे वायनाड येथील लोकसभा सदस्यत्व रद्द केले आहे. परिणामी वायनाडची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी निवडणूक आयोग विशेष पोटनिवडणूक जाहीर करु शकते अशी चर्चा आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2023 10:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

