Vinod Tawde, Rahul Gandhi | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्य वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबद्दल केलेल्या टीकेनंत भारतीय जनात पक्ष (BJP) आक्रमक झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनीही राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तावडे यांनी म्हटले आहे की, वायनाडचे खासदार राहिलेल्या राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्यावर टीका करण्यापूर्वी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्णपणे वाचावा. त्यांना इतिहासाची आजिबातच माहिती नाही.

तावडे यांनी राहुल यांच्यावरील हल्ला कायम ठेवत म्हटले की, त्यांनी सावरकरांवर टीका आणि द्वेश करण्याऐवजी आगोदर इंदिरा गांधी, मनोमोहन सिंह आणि प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काढलेले उद्गार आणि मत अभ्यासावे.

राहुल गांधी आणि इतरही काँग्रेस नेते क्षुद्र राजकारणासाठी राजकारणासाठी स्वातंत्र्यसैनिक सावरकरांच्या विचारांचा विपर्यास करण्यात गुंतले आहेत. अशा वेळी देशाने सावरकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाकडे नव्याने पाहण्याची गरज आहे, असे सांगतानाच विनोद तावडे म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिक सावरकर यांच्यावर पहिले टपाल तिकीट काढले होते. तर मनमोहन सिंग यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सावरकरांच्या महान योगदानाची कबुली दिली होती, असे तावडे म्हणाले. (हेही वाचा, Rahul Gandhi: शिक्षेविरुद्ध अपील करण्यासाठी राहुल गांधी सोमवारी सुरत कोर्टात हजर राहण्याची शक्यता)

तावडे यांनी पुढे म्हटले की, काँग्रेसच्या स्वयंभू नेत्या बनलेल्या सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनाही इतिहासाचा हा पैलू माहीत असायला हवा. सावरकर हे केवळ स्वातंत्र्यलढ्यातील प्रखर देशभक्त नव्हते तर ते नायकही होते. तसेच ते एक सशस्त्र क्रांतिकारक आणि उत्कृष्ट साहित्यिक देखील. सावरकरांनी कविता, नाटक, साहित्य आणि चिंतनात्मक लेखन अशा साहित्याच्या विविध आयामांमध्ये आपली प्रतिभा दाखविल्याचे भाजप नेते म्हणाले. सावरकरांच्या सामाजिक जाणिवेची आणि प्रखर राष्ट्रवादाची झलक त्यांच्या गोमंतक, सप्तर्षी, रानफुले, कमला, अग्निजा, अग्निनृत्य, कुसुमसंचाया या शास्त्रीय रचनांमध्येही पाहायला मिळते, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, 'मोदी आडनाव' टिप्पणीवरून गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर खासदार म्हणून अपात्र ठरलेले राहुल गांधी आयोजित पत्रकार परिषदेत 25 मार्च रोजी म्हणाले होते की, "माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत".