Pune Koyta Gang Attack: पाण टपरी वर कोयत्याने हल्ले, दुकानदारही जखमी; 3 जण अटकेत
Crime (PC- File Image)

पुण्यामध्ये (Pune)  कोयता गॅंग (Koyta Gang) च्या दहशतीचा अजून एक फटका पाणी टपरीवाल्याला बसल्याचं समोर आलं आहे. गैरसमजूतीमधून पुण्यात हा हल्ला झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. पुण्यातील कोंढवा (Kondhava) भागातील ही घटना असून 3 जणांना या प्रकरणी अटक झालेली आहे. या हल्ल्याचा एक व्हिडिओ देखील आता समोर आला आहे.

रिपोर्ट्सनुसार, धर्मेंद्र गुप्ता याच्या पानटपरीच्या दुकानावर हल्ला झाला आहे. ते दुकानात बसलेले असताना अचानक 3 जण त्याच्या टपरीजवळ आले. सामानाची धासधूस करण्यात आली आणि एकाने कोयत्याने वार केले. धर्मेंद्र गुप्ता यांनी या प्रकरणाची कोंढवा पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी त्यावरून कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे.

महमद वाडी मध्ये दुचाकीची लाईट समोर असलेल्या तरुणांच्या डोळ्यावर चमकावल्याच्या प्रकरणामध्येही दोन गटात वादावादी आणि नंतर कपडे फाटेपर्यंत हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला होता. या संपूर्ण प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पुण्यात अनेक ठिकाणी कोयता गॅंगची दहशत असल्याने पोलिसांसमोर या गुन्हेगारी प्रवृत्तीला रोखण्याचं मोठं आव्हान आहे. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आरोपी अल्पवयीन असल्यास त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल केले जातील असेही जाहीर केले आहे.