Prashant Bhushan | (Photo Credits: Facebook)

ज्येष्ठ वकील प्रशांत (Prashant Bhushan) यांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायलय अवमानना प्रकरणात (Court Contempt Case) दोषी ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर मंगळवारी (25 ऑगस्ट 2020) सुनावणी झाली. न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालय आता या प्रकरणाचा निकाल येत्या 10 सप्टेंबरला देणार आहे. या प्रकरणाच्या सुनावणी वेळी अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल आणि प्रशांत भूषण यांचे वकील राजीव धवन यांनी सजा न देण्याची मागणी केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, प्रशांत भूषण यांनी केलेले ट्विट हे उचीत नव्हते. प्रशांत भूषण न्यायालय अवमान प्रकरणाच्या सुनावणीतील 5 महत्त्वाचे मुद्दे.

माफ करा आणि सोडून द्या

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी म्हटले की, या प्रकरणात प्रशांत भूषण यांना कडक शब्दात समज देऊन माफ करण्यात यावे. त्यांना शिक्षा देण्यात येऊ नये.

'प्रशांत भूषण यांचे उत्तर अधिक अपमानास्पद'

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, प्रशांत भूषण यांनी आपल्या टिप्पणीबाबत दिलेल्या उत्तरादाखल जी प्रतिक्रिया दिली आहे ती अत्यंत अपमास्पद आहे. प्रशांत भूषण यांनी 2009 मध्ये केल्या विधानादाखल दिलगीरी व्यक्त केली होती. मात्र, माफी मागण्यास त्यांनी ठामपणे नकार दिला होता.

प्रकरण चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे सोपवले

प्रशांत भूषण यांच्यासंबधीचे हे प्रकर 2009 पासूनचे आहे. यावरील याचिका सध्यस्थितीत टळली आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने हे प्रकरण आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया (Chief Justice of India) कडे सोबवले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे नवे खंडपीठ या प्ररकणाची सुनावणी करणार आहे. (हेही वाचा, 'श्रीकृष्णाचा जन्म आज जेल मध्ये झाला आणि तुला त्यादिवशी जामीन हवाय'? CJI बोबडे यांचा खूनाच्या आरोपीला प्रश्न)

न्यायालयाने निकाल राखून ठेवला

ज्येष्ठ वकील प्रशांत (Prashant Bhushan) यांच्याशी संबंधीत एका जुन्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. प्रशांत भूषण यांनी न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपाबाबतचे हे प्रकरण आहे. हे प्रकरण 2009 पासून न्यायालयात प्रलंबीत होते. या प्रकरणावर न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायालयाने प्रशांत भूषण यांना या प्रकरणात दोषी ठरवले. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे. न्यायालय आता या प्रकरणाचा निकाल येत्या 10 सप्टेंबरला देणार आहे. (हेही वाचा, वकील प्रशांत भूषण सर्वोच्च न्यायालय आणि CJI विरूद्ध आक्षेपार्ह ट्वीट केल्याच्या प्रकरणात दोषी; 20 ऑगस्टला होणार शिक्षेची सुनावणी)

काय आहे प्रकरण?

प्रशांत भूषण यांनी 2009 मध्ये केलेल्या एका विधानात सर्वोच्च न्यायालयाच्या 8 माजी न्यायाधीशांना भ्रष्ट म्हटले होते. त्यानंतर भूषण यांनी आपल्या विधानाबाबत दिलगीरी व्यक्त केली होती. मात्र कोणत्याही स्थिती माफी मागण्यास नकार दिला होता. त्यावेळी भूषण यांनी म्हटले होते की, माझ्या म्हणण्याचा उद्देश हा भ्रष्टाचार म्हणायचे नव्हते. तर योग्य पद्धतीने कर्तव्य निभावन्याबाबत मी वक्तव्य केले होते.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे. न्यायालय येत्या 10 सप्टेंबरला काय निर्णय देणार याबाबत उत्सुकता आहे.