सर्वोच्च न्यायालयामध्ये आज (14 ऑगस्ट) वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan)यांना देशाचे सरन्यायाधीश आणि कोर्टाच्या न्यायव्यवस्थेबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. दरम्यान न्यायाधीश अरूण मिश्रा, बी आर गवई आणि कृष्ण मुरारी या तीन न्यायाधीशांनी ही सुनावणी केली असून शिक्षा 20 ऑगस्ट दिवशी सुनावली जाणार आहे.
दरम्यान प्रशांत भूषण यांनी दोन आक्षेपार्ह ट्वीट्स केल्याने त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून 22 जुलै दिवशी नोटीस देण्यात आली होती. दरम्यान 27 जून दिवशी प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाबद्दल तर 29 जून दिवशी देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. दरम्यान यामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजेच कोर्टाचा अवमान झाल्याचं सांगण्यात त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
ANI Tweet
Supreme Court holds lawyer Prashant Bhushan guilty of contempt of court for his alleged tweets on CJI and his four predecessors. The Court to hear the arguments on sentence against him on August 20. pic.twitter.com/4IUx7W0Wqj
— ANI (@ANI) August 14, 2020
नोटीशीला उत्तर देताना वकील प्रशांत भूषण यांनी सांगितले होते की मागील 4 माजी सरन्यायाधीशांबद्दलचे ट्वीट हे माझे मत आहे ते अप्रिय वाटत असले तरीही अवमानकारक नाही. तसेच सरन्यायाधीशांवरील टीका हा कोर्टाचा अवमान नाही.