PNB खातेधारकांनी 30 जून पर्यंत उरकून घ्या 'हे' जरुरी काम अन्यथा होईल मोठी समस्या 
Punjab National Bank (Photo Credits: PTI | Representational Image)

जर तुमचे पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) खाते असल्यास तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण युनायटेड बँक ऑफ इंडिया  (United Bank Of India) आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (Oriental Bank Of Commerce) यांचे पीएनबी बँकेत विलिकरण करण्यात आले होते. त्यानंतर या दोन्ही बँकांनी चेकबुक आणि IFSC कोड बदलले आहेत. अशातच PNB ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक ट्विट करत माहिती दिली आहे. त्यात असे म्हटले आहे की, ज्या ग्राहकांकडे या बँकेचे जुने चेकबुक आहे त्यांनी येत्या 30 जून पर्यंत ते वापरु शकतात.

पीएनबीने ट्विट करत अशी माहिती दिली आहे की, कस्टमर्सद्वारे बँकेचे जुने चेकबुकचा वापर 30 जून 2021 पर्यंत केला जाऊ शकतो. अशातच 30 जून पर्यंत ग्राहकांना नवीन चेकबुक घ्यावे लागणार आहे. जेणेकरुन तुम्हाला भविष्या कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामोरे जावे लागणार नाही.(Tata Steel कंपनीचा मोठा निर्णय, कोविडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या परिवाराला 60 वर्षापर्यंत मिळणार पूर्ण वेतन)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएनबीकडून असे सांगण्यात आले की त्यांनी लवकरच नवे चेकबुक मिळवण्यासाठी अर्ज करावा. तसेच दोन्ही बँकांनी ग्राहकांना नवा IFSC आणि MICR सुद्धा दिला आहे. त्यामुळे जर ग्राहकांना ही माहिती मिळाली नसेल तर त्यांनी बँकेला SMS पाठवून याबद्दल अधिक माहिती करुन घ्यावे.(Variable Dearness Allowance (DA) Hike: केंद्र सरकारने कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्त्याबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय;पहा नेमका कोणा-कोणाला होणार फायदा)

तसेच खातेधारकांना रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन UPGR <अकाउंट क्रमांकाचे अखेरचे 4 डिजिट> लिहून 9264092640 यावर SMS पाठवावा लागणार आहे. तसेच खातेधारकांना पंजाब नॅशनल बँकेच्या टोल फ्री क्रमांक1800-180-2222 आणि 1800-103-2222 येथे सुद्धा संपर्क करु शकतात. खातेधारकांद्वारे are@pnb.co.in या ईमेलवर सुद्धा मेल पाठवता येणार आहे.