Tata Steel कंपनीचा मोठा निर्णय, कोविडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या परिवाराला 60 वर्षापर्यंत मिळणार पूर्ण वेतन
TATA Steel | (Photo credit: Tata Steel)

कोरोनामुळे लाखो नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे काही परिवाराने घरातील कर्ताधर्ता पुरुष किंवा स्री गमावल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे बहुतांश मुले अनाथ झाली आहेत. अशातच आता त्यांना दिलासा देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या विविध प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान आता टाटा स्टिल (Tata Steel) कंपनीने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.टाटा स्टिलने यांनी आपल्या निर्णयात असे म्हटले की, आपल्या कर्मचाऱ्याचा जर कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर त्यांच्या परिवाराला मृत कर्मचाऱ्याच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत पूर्ण वेतन दिले जाणार आहे. त्याचसोबत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सुद्धा संपूर्ण व्यवस्था कंपनीकडून केली जाणार आहे. तसेच मेडिकल आणि घरासंबंधित सुविधा सुद्धा त्यांना मिळणार आहेत.(Medical Robot: पटना येथील इंजिनियरींगच्या विद्यार्थीनीने तयार केला रोबोट; कोरोना रुग्णांच्या सेवेत करणार डॉक्टरांची मदत)

टाटा स्टिलच्या प्रबंधकांनी असे म्हटलेक, कंपनी आपल्या कर्मचाऱ्याच्या सामाजिक सुरक्षिततेच्या नुसार शक्य तेवढी मदत करणार आहे. यामागील कारण म्हणजे कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे भविष्य उत्तम व्हावे. टाटा प्रबंधकांनी पुढे म्हटले की, जर कोरोनामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला टाटा स्टिलकडून वयाच्या 60 वर्षापर्यंत संपूर्ण पगार देणार आहे. या व्यतिरिक्त सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचा ड्युटी दरम्यान मृत्यू झाल्यास त्यांच्या मुलांना भारतात ग्रॅज्युएशन पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च कंपनी उचलणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या आश्रयितांना चांगली रक्कम आणि पेन्शनची सुविधा देत आहे. मात्र खासगी क्षेत्रातील कर्माचाऱ्यांना काहीच मिळत नाही. परंतु कोरोनाच्या संकट काळात खासकरुन दिग्गज खासगी कंपन्यांनी मोठ्या मनाने मदत करण्याचे पाऊल उचलले आहे.(लहान मुलांवर Covaxin च्या ट्रायल्स जून 2021 पासून सुरू होण्याची शक्यता; Bharat Biotech ची माहिती)

टाटा स्टिलने त्यांच्या एका विधानात असे म्हटले की, कंपनी नेहमीच आपल्या कर्मचारी आणि स्टेकहोल्डर्सच्या लाभासाठी विचार करत आली आहे. कोविड दरम्यान सुद्धा टाटा स्टिल आपल्या कर्मचाऱ्यांसह सामाजिक कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यापूर्वी सुद्धा टाटाने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काही महत्वपूर्ण पावले उचलली आहेत.