PM Narendra Modi's Address to The Nation Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 वाजता देशाला संबोधणार, DD न्यूजवर पहा लाइव्ह
Narendra Modi | (Photo Credits: ANI/Twitter)

PM Narendra Modi's Address to The Nation Live Streaming: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे आता सर्व जनतेचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागून राहिले आहे. या संबोधनात मोदी काहीतरी महत्वाची घोषणा करतील का हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मोदी यांचे हे लाइव्ह स्ट्रिमिंग संध्याकाळी 6 वाजता DD News चॅनलवर पाहता येणार आहे. तर सध्याची कोरोनाची परिस्थिती आणि देशात सुरु होणाऱ्या सणासुदीच्या दिवसांबद्दल काही बोलतील का याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

मोदी यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, मी आज संध्याकाळी 6 वाजता देशाला संबोधित करणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे. तसेच कोरोनाच्या संदर्भात मोदी बोलू शकतात. तर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कोरोनाच्या काळात आता सातव्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाषणात काय बोलणार या बद्दल स्पष्ट केलेले नाही. तर कोरोनाच्या परिस्थिती बद्दल बोलण्यासह येणाऱ्या सणांबद्दल ही काही घोषणा केल्या जाऊ शकतात.(Rahul Gandhi on PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आव्हान म्हणाले आजच्या भाषणात 'या' मुद्द्याबाबतही बोला')

दरम्यान, भारतात मंगळवारी कोरोनाचे आणखी 46,790 रुग्ण आढळले होते. तसेच 587 जणांचा गेल्या 24 तासास बळी गेला आहे. त्यामुळे देशातील एकूणच कोरोनाचा आकडा 75,97,064 वर पोहचला आहे. एकूण मृतांचा आकडा देशातील हा 1,15,197 वर गेल्याचे मंगळवारी दिसून आले आहे.