Rahul Gandhi on PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आव्हान म्हणाले आजच्या भाषणात 'या' मुद्द्याबाबतही बोला'
राहुल गांधी आणि पीएम मोदी (Photo Credit: PTI)

Rahul Gandhi on PM Narendra Modi:  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता देशातील जनतेला संबोधणार आहेत. तर सध्याची एकूणच कोरोनाची परिस्थिती पाहता मोदी त्यावर बोलतीलच पण अन्य कोणत्या मुद्द्यांवर ते भाष्य करणार याकडे सर्वांचे लागून राहिले आहे. याच पार्श्वभुमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या भाषणापूर्वी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना आव्हान करत मोदीजी तुम्ही आजच्या भाषणात चीनी लोकांच्या मुद्द्याबद्दल ही स्पष्ट करावे असे म्हटले आहे.(Sonia Gandhi Criticizes BJP: भाजप सरकार मुलींना सुरक्षा देण्याऐवजी गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे- सोनिया गांधी)

राहुल गांधी यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, नरेंद्र मोदीजी तुम्ही 6 वाजता देशाला संबोधित करणर आहेत. त्यामुळे आता देशाला त्यावेळी हे सुद्धा सांगा की, कोणत्या तारखेला तुम्ही चीनी लोकांची भारता मधून हकालपट्टी करणार आहात. तसेच मला नाही वाटत जगातील असा कोणता देश आहे जो आपल्याच जमीनीवर खुसघोरी प्रकरणी शांत बसेल. मला असे वाटते तुम्ही यावर बोलावे. मी तुम्हाला सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही आहे. ऐवढेच नाही तर ते चीन या शब्दाचा उच्चार सुद्धा करणार नाहीत. आम्ही त्यांच्या पत्रकार परिषदा पाहिल्या आहेत. (PM Narendra Modi आज संंध्याकाळी 6 वाजता भारतीयांना संबोधित करणार)

तसेच राहुल गांधी यांनी सीएए वरुन सुद्धा असे म्हटले आहे की, आमची स्थिती बहुतांश स्पष्टच आहे. आमचा विचार आहे लोकांना एकजूट करायचा. भाजपला या गोष्टीवर बोलायला हवे की, चीनी आपल्या जागेवर का कब्जा करुन बसले आहेत. त्यांनी आपल्या जमिनीच्या 12 हजार स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरात अतिक्रमण केले आहे. आमचे पंतप्रधान खोटे बोलत आहेत की कोणीही आपली जमीन घेतलेली नाही.