Sonia Gandhi Criticizes BJP: भाजप सरकार मुलींना सुरक्षा देण्याऐवजी गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे- सोनिया गांधी
Congress President Sonia Gandhi (Photo Credits: ANI)

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सामूहिक बलात्कार प्रकरणी संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात आहे. देशातील दलित बंधू-भगिनींवरील अत्याचार वाढत आहेत. याप्रकरणी अनेक राजकीय नेते भाजपवर (BJP) निशाणा साधत आहेत. यातच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी महिला सुरेक्षेचा प्रश्न उपस्थित केला असून भाजप सरकार मुलींना सुरक्षा देणयाऐवजा गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे, असा आरोपदेखील त्यांनी केला आहे. तसेच पीडित कुटुंबांचा आवाज दाबला जात आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा प्रश्न सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे.

देशासाठी सतत संघर्ष करणे हे कॉंग्रेस संघटनेचे ध्येय आहे. देशाची सेवा करणे हे आमच्या संस्थेचे मुख्य केंद्र आहे. आज देशाची लोकशाही कठीण टप्प्यातून जात आहे. एवढेच नव्हेतर, देशातील पीडित कुटुंबांचा आवाज दडपला जात आहे, अशा आशयाचे ट्विट सोनिया गांधी यांनी केले आहे. हे देखील वाचा- हृदयद्रावक! गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून धडापासून वेगळं केलं शीर

एएनआयचे ट्विट-

दरम्यान, सोनिया गांधी यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या तीन कृषी कायद्यांवरून देखील टीका केली आहे. यासंदर्भात ते म्हणाले की, ही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असे त्या म्हणाल्या आहेत. तसेच देशातील अर्थव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीवरून देखील त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.