PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सम्मान निधी ( Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Schem) येजनेतील पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात शुक्रवारी (25 डिसेंबर 2020) जमा केला. या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांवरुन विरोधकांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, देशभात कंत्राटी शेती बाबत काही लोक गैरसमज पसरवत आहेत. अरुणाचल प्रदेशमधील एका शेतकऱ्यासोबत बोलताना त्यांनी या मुद्द्यावर विशेष भर दिला. या वेळी पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलन (Farmers Protest) , कृषी कायदा, पश्चिम बंगाल (West Bengal), केरळ (Kerala), ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), एपीएमसी (APMC) यांसह इतरही विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बटन दाबत 9 कोटी रुपयांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपये हस्तांतरीत केले. या वेळी त्यांनी जनतेशी संवाद (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) साधला.

या वेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील कृषी धोरण आणि व्यवस्था सुधारणा करणाऱ्यंमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचाही समावेश होतो. ते देशातील भ्रष्टाचाराला एक प्रकारचा रोग मानत. आगोदर शेतकऱ्यासाठी आलेला रुपया शेतकऱ्याच्या हाती लागत नसे. आता तोच रुपया थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. पीएम किसान सन्मान योजना त्याचेच एक उदाहरण आहे. ( हेही वाचा, Priyanka Gandhi In Delhi Police Custody: राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात)

काही लोक स्वार्थी राजकारण करत आहेत. परंतू, जनता अत्यंत बारकाईने पाहते. जे पक्ष पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांची स्थिती काय आहे याबाबत विचार करत नाहीत ते दिल्ली, आणि पंजाब येथे येऊन आंदोलन करत आहेत. देशाची अर्थव्यवस्था बर्बाद करण्यामागे लागले आहेत. मी या पक्षांना विचारु इच्छितो की, हे लोक शेतकरी आंदोलनात फटो काढण्याचे कार्यक्रम करतात. जरा केरळ, पश्चिम बंगाल येथेही आंदोलन सुरु करा. तेथे APMC अस्तित्वातच नाही. पंजाबच्या शेतकऱ्यांना भरकटवले जात आहे. त्या शेतकऱ्यांना भरकटवण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. मात्र केरळच्या शेतकऱ्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. आपले दुहेरी राजकारण आता चालणार नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 1.10 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचविण्यात आले. आता काही लोक गैरसमज पसरवत आहेत कंत्राटी शेती अस्तित्वात आल्यास शेतकऱ्यांची जमीन जाईल. परंतू असे होणार नाही. महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने सांगितले कंत्राटी शेती केल्यामुळे तर आम्हाला एक नवा पर्याय मिळेल.