Priyanka Gandhi (Photo Credits: ANI)

काँग्रेस (Congress) पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांच्यासह काही नेत्यांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती भवनावर (Rashtrapati Bhavan) मोर्चा घेऊन निघाले होते. हे सर्व जण राष्ट्रपती भवन येथे जाऊन केंद्र सरकारच्या कृषी कायद्या (Farm Law) विरोधात 2000 कोटी शेतकऱ्यांनी केलेल्या स्वाक्षऱ्यांची पत्रं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सुपूर्त करणार होते.दरम्यान, पोलिसांनी सर्वांना मध्येच अडवले. यावेळी काँग्रेस नेते आणि दिल्ली पोलीस यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक घडली.

राहुल गांधी यांनी दिल्ली पोलिसांना सांगितले की, देशात लोकशाही आहे आणि मला देशातील जनतेने निवडून दिले आहे. त्यामंळे राष्ट्रपतींना भेटणे हा माझा अधिकार आहे. त्यांना भेटण्यापासून आपण मला रोखू शकत नाही. सरकारला नेमकी अडचण काय आहे? सरकार दिल्लीच्या सीमेवर तंबू ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांचे काहीच ऐकत नाही. (हेही वाचा, Rahul Gandhi On Farm Laws: देशात लोकशाही केवळ कागदोपत्री, पंतप्रधान केवळ उद्योगपतींसाठी काम करतात- राहुल गांधी)

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी म्हटले की, जवान हे शेतकऱ्यांचीच मुलं असतात. आज ज्या शेतकऱ्याचा आवाज ऐकला नाही. जो शेतकरी आज आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आज शेतकरी उन, पाऊस, थंडी यांचा विचार न करता दिल्लीच्या सीमेवर आहे. या सरकारा या शेतकरी आणि त्याच्या सैन्यात असलेल्या जवान मुलांबाबत काहीच ममत्व नाही? की सरकारला केवळ राजकारण आणि त्यांच्या उद्योगपती मित्रांबद्दलच कळवळा आहे? असा सवालही प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राष्ट्रपतींना भेटून आल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने संमत केलेला कृषी कायदा हा शेतकरी विरोधातील आहे. त्यामुळेच अवघा देश केंद्र सरकारच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांची भूमिका अवघ्या देशाने पाहिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा कायदा मागे घ्यावा. केंद्र सरकार जोपर्यंत हा कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.