PM Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ते 25 जून दरम्यान अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्यावर जात आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांच्या निमंत्रणावरून त्यांचा अमेरिका दौरा होत आहे. या दौऱ्यापूर्वी यूएस प्रतिनिधी माईक कॉलिन्स यांनी पीएम नरेंद्र मोदींचा उल्लेख एक 'खास पाहुणे' म्हणून केला आहे. मोदींच्या अमेरिका दौऱ्याविषयी माहिती देताना माईक म्हणाले, '22 जून रोजी दोन्ही सभागृहांशी बोलण्यासाठी आमच्याकडे एक अतिशय खास पाहुणे येत आहेत ते म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारत आणि युनायटेड स्टेट्स यांचे केवळ आर्थिकदृष्ट्या चांगले संबंध नाहीत, तर दोन्ही देश दहशतवाद आणि मोठा शत्रू चीनचा सामना करण्यासाठी एकत्र लढत आहेत. अशात पीएम मोदी आम्हाला संबोधित करण्यासाठी येत आहेत.'

पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याची सुरुवात न्यूयॉर्कमध्ये होणार आहे, जिथे मोदी 21 जून रोजी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याचे नेतृत्व करतील. त्यानंतर, पीएम मोदी वॉशिंग्टन डीसीला जातील, जिथे 22 जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये त्यांचे औपचारिक स्वागत केले जाईल. यावेळी ते राष्ट्रपती बिडेन यांच्याशी चर्चा करतील. त्याच दिवशी संध्याकाळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ बिडन्सद्वा राजकीय भोजनाचे आयोजन केले जाईल. (हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आढवड्यात युएस दौऱ्यात; गायिका मेरी मिलबेन मोठ्या उत्सुकात करणार स्वागत(Watch Video)