केंद्र सरकार आणि काही राज्यांनी पेट्रोल, डिझेल उत्पादन शुल्क (Excise Duty Cut) कमी केली. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol, Diesel Price) काहीशा कमी झाल्या आहेत. केंद्र सरकारने पेट्रोलवरील एक्साईज ड्यूटी 5 रुपये आणि डिझेलवरील एक्साईज ड्यूटी 10 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही राज्य सरकारांनीही पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला. इंधन दरांबाबत केंद्र आणि राज्य सरकारांनी घेतलेल्या निर्णयामुळे इंधन दरात घट झाली आहे. त्यात उल्लेखनीय असे की आज (5 नोव्हेंबर) तेल वितरण कंपन्यांनी कोणत्याही प्रकारे तेल दरात बदल केला नाही. त्यामुळे नव्या बदलांसह पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.
भारतातील प्रमुख शहरांतील इंधन दर (प्रति लीटर प्रमाणे)
दिल्ली:
पेट्रोल- 103.97 रुपये
डीजल- 86.67 रुपये
मुंबई:
पेट्रोल- 109.98 रुपये
डीजल- 94.14 रुपये
कोलकाता:
पेट्रोल- 104.67 रुपये
डीजल- 89.79 रुपये
चेन्नई:
पेट्रोल- 101.40 रुपये
डीजल- 91.43 रुपये
नोएडा:
पेट्रोल- 101.29 रुपये
डीजल- 87.42 रुपये
भोपाल:
पेट्रोल- 106.86 रुपये
डीजल- 90.95 रुपये
बेंगलुरु:
पेट्रोल- 107.64 रुपये
डीजल- 92.03 रुपये
लखनऊ:
पेट्रोल- 100.78 रुपये
डीजल- 86.85रुपये
चंडीगढ:
पेट्रोल- 100.12 रुपये
डीजल- 86.46 रुपये
जगभरातील तेल बाजारातील कच्चा तेलाचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. सहाजिकच आंतरराष्ट्रीय तेल बाजारांचा विविध देशांतील देशांतर्गत तेल बाजारावर मोठा परिणाम होतो. पाठीमागच्या ऑक्टोबर महिन्यात जवळपास 20 ते 25 दिवस कच्चा तेलाचे भाव वाढले होते. परिणामी भारतातील तेल दरांचे भावही मोठ्या प्रमाणावर वाढले. काही जिल्ह्यांमध्ये तर पेट्रोलचे भाव 121 रुपयांच्याही वर गेले होते. काही शहरांमध्ये पेट्रोल शंभरीपार गेले. त्यामुळे महागाई वाढली. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटी कमी केली. त्यामुळे केंद्र सरकारला 1.4 लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.