Petrol, Diesel Price: काय सांगता? पुन्हा वाढणार पेट्रोल, डिझेल दर? Excise Duty ठरणार केवळ वरवरचा मुलामा?
Fuel Price in India | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्र सरकारने उत्पादन शुल्क (Excise Duty) कमी केल्यामुळे पेट्रोल, डिझेल (Petrol, Diesel Price) दरात कपात झाली खरी. मात्र, ही दरकपात केवळ औटघटकेची ठरण्याची शक्यता आहे. उर्जा क्षेत्रात काम करणारे अभ्यासक आणि तज्ज्ञ नरेंद्र तनेजा सांगतात की नजीकच्या काळात पेट्रोल, डिझेल दर (Petrol and Diesel Price) पुन्हा वाढतील. त्यामुळे दिवाळीत (Diwali) झालेल्या इंधन दरकपातीवरुन ग्राहकांनी हुरळून जाण्याचे कारण नाही, असाही सावध इशारा अभ्यासक देतात.

नरेंद्र तनेजा यांनी एएनआयसोबत बोलताना गुरुवारी सांगितलेकी, आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की,आपण तेल आयात करतो. तेल ही एक आयात करावा लागणारा घटक आहे. आज आपल्याला जवळपास 86% तेल आयात करावे लागते. तेलाच्या किमती सरकारच्या हातात नाहीत. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही यंत्रणा नियंत्रणमुक्त वस्तू आहेत. जुलै 2010 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळातील सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले आणि 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिझेल नियंत्रणमुक्त केले. (हेही वाचा, Impact of Excise Duty Reduction: पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कपातीचा काय होणार परिणाम? केंद्रावर किती पडणार बोजा, जनतेचा किती फायदा?)

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात इतकी तेजी येण्याचे प्रमुख कारण हे कोरोना महामारी आहे. तनेजा सांगतात, बाजाराचा नियम आहे. जेव्हा मागणी आणि पुरवठा यांच्या असमानता निर्माण होते. तेव्हा किमती वाढतात. दुसरे कारण म्हणजे तेल विश्वात होणारी कमी गुंतवणूक. कारण अनेक देशांची सरकारे सौर उर्जा आणि इलेक्ट्रिक उर्जा यांसारख्या नव्या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात गुंतवणूक कमी होते आहे. परिणामी कच्चे तेल अधिक महाग होत आहे.

कच्चा तेलाच्या किमती जेव्हा कमी होतात तेव्हा केंद्र सरकार उत्पादन शुल्क (एक्साईज ड्युटी) वाढवते. जेव्हा तेल खूप महाग होते तेव्हा सरकार तेलाच्या किमती कमी करते. कोरोना काळात तेलाची मागी 40 टक्यांनी घटली होती. पुढे तर ही मागणी 35 टक्क्यांपर्यंत खाली आली होती. जेव्हा विक्री कमी होईल तेव्हा सरकारचे उत्पादन आपोआपच कमी होते. आता कोवीडपूर्वीच्या काळाप्रमाणे सरकारचे उत्पादन वाढत आहे, असेही तनेजा सांगतात.