One 97 Communications Layoffs: पेटीएमची मातृकंपनी वन 97 कम्युनिकेशन्स करतीय टाळेबंदी; अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात; कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे सावट
Paytm Layoffs | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Paytm ची मूळ कंपनी One 97 Communications, तिच्या वार्षिक कामगिरीच्या पुनरावलोकनाचा भाग म्हणून विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे फिनटेक युनिकॉर्नच्या पेमेंट बँकांवर दाखवलेल्या त्रुटींमुळे विस्तारीत छाननीच्या अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात (One 97 Communications Layoffs) आल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे. कंपनीच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, कार्यप्रदर्शन मूल्यमापन ही एक नियमीत बाबत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

मनीकंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्ताचा दाखला देत इतर प्रसारमाध्यांनी म्हटले आहे की, नियामक छाननी आणि अंतर्गत पुनर्रचनेदरम्यान, Paytm ची मूळ कंपनी One 97 Communications वार्षिक कामगिरी पुनरावलोकनाचा भाग म्हणून कर्मचारी कपात करत आहे. पेटीएमच्या पेमेंट बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून योग्य परिश्रम आवश्यकतांचे पालन करण्यात कथित त्रुटींबद्दल वाढीव छाननीचा सामना करावा लागत असताना कंपनीने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कंपनीच्या या निर्णयाचा किती कर्मचाऱ्यांना फटका बसेल याबाबत निश्चित आकडेवारी पुढे आली नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीतील विविध विभागांना गेल्या दोन आठवड्यांत त्यांचा संघ आकार 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा, Jio To Enter In UPI Payments: मुकेश अंबानींची जिओ कंपनी लवकरच युपीआय सेगमेंटमध्ये प्रवेश करणार; Paytm आणि PhonePay शी होणार स्पर्धा)

पेटीएमच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, विद्यमान स्थितीत कंपनीच्या कामगिरीचा आणि त्रुटींचा आढवा घेण्याचे काम सुरु आहे. हा आढावा घेताना मूल्यमापण करुन कार्यप्रदर्शन-आधारित नोकरी समायोजन होऊ शकते. अर्थात हे उपाय टाळेबंदीपेक्षा वेगळे आहेत आणि कार्यक्षमता,खर्च-प्रभावीतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता-संचालित ऑटोमेशनचा लाभ घेण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांचा भाग आहेत. (हेही वाचा, Expedia Layoffs: ट्रॅव्हल टेक कंपनी एक्सपीडिया 1,500 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार; प्रवासाची मागणी कमी झाल्याने घेतला निर्णय)

कर्मचाऱ्यांमध्ये संभाव्य नोकरी संपुष्टात येण्याबाबत चिंता कायम असताना, कंपनीने मात्र ही प्रक्रिया नियमित कामगिरी मूल्यमापनाचा भाग असल्याचे म्हटले आहे. एक महिन्याच्या परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन (PIP) वर ठेवल्यानंतर कर्मचारी नोकरी जाण्याची भीती व्यक्त करतात, काहींनी मागील उदाहरणांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात टाळेबंदीचा आरोप केला आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी फेब्रुवारीमध्ये टाऊन हॉलमध्ये नोकरीच्या सुरक्षेबाबत आश्वासन देऊनही, कर्मचारी अनिश्चिततेच्या सावटाखाली आहेत. ते नोकरीच्या पर्यायी संधी शोधत आहेत. नियामक आव्हाने आणि अंतर्गत पुनर्रचना प्रयत्नांमध्ये कंपनीचे कर्मचारी टिकवून ठेवण्याच्या संभाव्य आव्हानांचे संकेत देणारे अहवाल जॉब मार्केटमध्ये पेटीएमच्या प्रवेशयोग्य प्रतिभांमध्ये वाढ झाल्याचे सूचित करतात. मात्र, हे किती काळ चालेल याबाबत काहीच सांगता येत नाही, असे अभ्यासक सांगतात.